…म्हणून आम्ही हरलो; भाजपच्या खासदारानं कबुल केली हार

मुंबई | जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात भाजपला अपयश आले त्यामुळे मध्य प्रदेशात पक्षाला पराभवाला सामोरं जावं लागलं, असा घरचा आहेर भाजपचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी पक्षाला दिला आहे.

जनतेच्या वाढत्या आशा-आकांक्षा आम्हाला पूर्ण करण्यात अपयश आले, असंही विनय सहस्रबुध्दे म्हणाले. ते एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलत होते.

मध्य प्रदेशातल्या पराभवाबाबत बोलताना, आमची निवडणुकीच्या काळातील धडपड कमी पडली असावी पण येणाऱ्या काळात पक्षसंघटन अधिक बळकट करण्याकडे आमचं लक्ष असेल, असंही सहस्रबुद्धे म्हणाले.

दरम्यान, पाच राज्यांत झालेल्या पराभवाबाबत विचारमंथन चालू आहे, येणाऱ्या काळात आम्ही अधिक जोमाने कामाला लागू, असंही विनय सहस्रबुद्धे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

-कितीही शर्यत केली तरी ते जिंकू शकत नाहीत; कारण आमचं वजनच वेगळं!

-रामानंतर आता विठ्ठलाचा धावा; उद्धव चंद्रभागेच्या तीरी करणार आरती!

-भाजप-शिवसेना युती होणारच-रावसाहेब दानवे

“‘हर हर मोदी, घर घर मोदी’ नारा देणाऱ्या मोदी सरकारला शेवटची घरघर”

-लोकसभेला काय करायचं ते आम्ही ठरवू; उद्धव ठाकरे पुन्हा आक्रमक