बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिंदे यांच्याबद्दल आदरच, पण आमच्या मनातील मुख्यमंत्री तुम्हीच”

मुंबई | शिवसंग्राम प्रतिष्ठानचे नेते विनायक मेटे यांचा आज वाढदिवस  आहे. यानिमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पुरस्काराचे (Award) आयोजन करण्यात आलं होत. याला उत्तर देताना विनायक मेटे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच तोडंभरुन कौतुक केलं. त्यावेऴी ते म्हणाले “आमच्या मनातले मुख्यमंत्री तुम्हीच आहात”.

आज या राज्यावर शिंदे-फडणवीस सरकार आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले याचा आम्हाला आदरच आहे. आमच्या दृष्टीने मात्र देवेंद्र फडणवीस हेच आमचे मुख्यमंत्री आहेत. मी हे बोलतोय म्हणजे मी एकनाथ शिंदेचा अवमान करतोय असा नाही. त्यांच्याबद्दल आदरच आहे. आपल्याला कोणी न्याय देणारं असेल तर ते फक्त देवेंद्र फडणवीस आहेत, असं म्हणत देवेंद्र फडणवीसचं (Devendra Fadnvis) कौतुक केलं

मविआ सरकारने काहीच कामं केली नाही. मराठा समाजाची दखल कोणीही घेतली नाही. तुम्ही सत्तेत येताच फक्त निर्णच नाही घेतला तर आरक्षण दिलं. मागच्या सरकारने एकाही समाजाला न्याय दिला नाही. ओबीसी (OBC) आरक्षण मविआ सरकारनं घालवलं. सगळ्या समाजावर त्यांनी अन्याय केला. अडीच वर्षे केवळ भ्रष्टाचार केला, अशी घणघणाती टीका मविआ सरकारवर केली.

यावर फडणवीस म्हणाले आज औरंगाबादच (Aurangabad) नामांतर झालं हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. आमच्या देशावर जे आक्रमण झाले, त्या गुलामीच्या खुणा पुसण्याचं काम यातून केलं आहे. आपण मतांसाठी नाही, तर समाजाच्या हितासाठी काम केलं पाहिजे. तेच आपल्या कामाचं ब्रीद होतं आणि यापुढेही राहील, असंही ते म्हणाले.

थोडक्यात बातम्या

बंडखोर आमदार संतोष बांगर म्हणाले ‘गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा’

महाराष्ट्राच्या ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवांना जान्हवी कपूर सारा अली खान यांनी केलंय डेट!

“फडणवीस माफ करतील, मात्र मी नाही, त्यांनी बदला नावाचा एक पोर्टफोलिओ काढावा”

अमिताभ बच्चन यांची नात नव्या लवकरच जाहिरीतीमध्ये दिसणार!

मोठी बातमी! शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More