मराठा समाजाचा वेगळा पक्ष काढून काय करणार?; विनायक मेटेंचा सवाल

शिर्डी | आपल्या राज्यात 40 टक्के मराठा समाज असल्यामुळे सर्वच पक्षामध्ये मराठा समाजाचे कार्यकर्ते आहे. त्यामुळे मराठा समाजाचा वेगळा पक्ष काढून काय करणार?, असा सवाल शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी उपस्थित केला. ते पत्रकारांशी बोलत होते.

गावखेड्यातील कोणी तरी उठायचं आणि पक्ष कढायचा तसे होत नाही. जर जातीच्या नावाने पक्ष काढला तर बाकीचे लोक त्याला सहकार्य करत नाहीत, असं ते म्हणाले.

सर्व पक्षातील नेत्यांनी परिवर्तनाचे काम केले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने न्याय मिळण्याचे काम होईल, असंही ते  म्हणाले.

दरम्यान, मागच्या सरकारने जे आरक्षण दिले आहे. ते चुकीच्या पद्धतीने दिले होते, असा आरोपही त्यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या-

-आगोदर आपल्या लोकांना संभाळा, मग काश्मीरची मागणी करा- शाहीद आफ्रिदी

-आम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं- नारायण राणे

-भाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश

-हिंम्मत असेल तर ‘सदाशिव पेठे’चं नाव ‘ठाकरे पेठ’ करा!

-दारूड्यांसाठी खुशखबर…दारूची दुकानं आता सकाळी 8 वाजताच उघडणार!