बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मजबुरी का नाम उद्धव ठाकरे!; “मंत्र्याची हकालपट्टी करण्यापासून कोण रोखत आहे?”

पुणे | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण सध्या चर्चेत आहे. याप्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्यावर टीका होत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काही दिवसांपूर्वी थेट संजय राठोडांवर आरोप केले होते. तेव्हापासून संजय राठोड नॉट रिचेबल होते. अखेर मंगळवारी पोहरादेवीच्या दर्शनासाठी गेलेले संजय राठोड 15 दिवसांनी सगळ्यांसमोर आले. यावेळी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण राठोडांनी दिलं. यावरून शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटेंनी सरकारवर निशाणा साधला आहे.

विनायक मेटे यांनी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित केली होती, यावेळी ते बोलत होते. बाळासाहेबांचे विचार बाजूला सारत उद्धव ठाकरे राज्यकारभार चालवत आहेत, बाळासाहेब असते तर, आरोप झालेल्या मंत्र्यांची हकालपट्टी केली असती. मात्र असं करण्यापासून उद्धव ठाकरेंना कोण रोखत आहे?, उद्धव ठाकरेंची नेमकी कोणती मजबुरी आहे? असे सवाल मेटेंनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारले आहेत. या सगळ्याचा अर्थ सरकारला नीतिमत्ता राहिलेली नाही, असं म्हणत मेटेंनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

पूजा चव्हाण हिनं आत्महत्या केली की कोणी तिची हत्या केली? हे सत्य लवकरच पुढे येईल. पोलीस तपास करत आहेत मात्र, माझा या तपासावर विश्वास नाही असं म्हणत हे प्रकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुखांनी स्वत:हून सीबीआय कडे सुपूर्द करावे, अशी मागणी विनायक मेटेंनी केली आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाचा निकाल येईपर्यंत शासकीय भरत्या, एमपीएससीच्या परीक्षा यासोबत उद्यापासून सुरू होणाऱ्या आरोग्य विभागाच्या भरत्या पुढे ढकलाव्यात, असं आवाहन विनायक मेटे यांनी केलं आहे. याच बरोबर सरकारमधील मराठा मंत्रीच मराठा समाजाचे वैरी झाले आहेत, अशी बोचरी टीकाही त्यांनी यावेळी केली.

थोडक्यात बातम्या-

“मुख्यमंत्री बलात्काऱ्याच्या मांडीला मांडी लावून बसलेत, संजय राठोडला तर चपलेनं झोडलं पाहिजे”

माझ्या आईवर कॅन्सर ट्रिटमेंट चालू आहे, तिच्यासाठी प्रार्थना करा- राखी सावंत

‘विद्यार्थ्यांनो तुमचं हे बागडण्याचं, खेळण्याचं वय आहे, पण…’; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची विद्यार्थ्यांना भावनिक साद

जगातल्या ‘या’ सर्वात मोठ्या स्टेडियमला दिलं जाणार नरेंद्र मोदींचं नाव!

‘…पण गर्दी जमवणाऱ्या एका गबरुवर कारवाई का नाही?’; आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More