महाराष्ट्र मुंबई

“मराठा आरक्षणासाठी नव्हे तर सातव प्रदेशाध्यक्ष होऊ नयेत म्हणून अशोक चव्हाण दिल्लीत”

मुंबई | अशोक चव्हाण हे दिल्लीत मराठा आरक्षणावरील सुनावणीबाबत वकिलांशी चर्चा करायला गेले नाहीत. काँग्रेस नेते राजीव सातव हे महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होऊ नयेत यासाठी मोर्चेबांधणी करायला अशोक चव्हाण दिल्लीत गेले आहेत, असा आरोप शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे.

चव्हाणांनी काल दिल्लीत मराठा आरक्षणाबाबत मराठा समाजाची बैठक घेतली असं सांगून मराठा समाजाची आणि राज्याची फसवणूक केली आहे. या बैठकीला अभिषेक मनु सिंघवी वगळता कोणताच वकील उपस्थि नव्हता, असं विनायक मेटे म्हणाले.

अशोक चव्हाण यांना आरक्षणाचं काहीच पडलेलं नाही. राजीव सातव हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता आहे. तशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्यामुळे सातव प्रदेशाध्यक्ष होऊ नयेत यासाठी चव्हाण काँग्रेस नेते राहुल गांधींकडे लॉबिंग करत असल्याचा दावा विनायक मेटे यांनी केलाय.

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर अशोक चव्हाण यांच्याकडे मराठा आरक्षण उपसमितीचं अध्यक्षपद सोपवण्यात आलं होतं. तेव्हापासून विनायक मेटे सातत्याने चव्हाण यांच्यावर टीका करत आहेत. अनेकदा मेटेंनी अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली आहे.

थोडक्यात बातम्या-

मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ?; किरीट सोमय्यांकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

तीन दिवसात दोनदा घसरले सोन्याचे भाव; आज काय आहे किंमत???

‘शेतकरी आंदोलन फसवे, आता हे नाटक बंद झाले पाहिजे’; भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

सरकारनं सुरक्षा काढली; मनसेनं स्थापन केलं स्वतःचं सुरक्षा पथक!

त्यांनी मुख्य हायवेने न जाता शाॅर्टकट घेतला आणि तिथंच घात झाला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या