विधानसभा निवडणूक 2019

“युतीसरकारच्या काळात आमच्यावर अन्याय झालाय… आतातरी आम्हाला विरोधीपक्षनेतेपद द्या”

पुणे | गेल्या अनेक वर्षापासून भाजपशी सूत जुळवून घेणाऱ्या शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी आता भाजपची कोंडी करण्याचं ठरवलं असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. विधान परिषदेत मी ज्येष्ठ आणि अनुभवी आमदार असल्याने विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता मलाच केलं पाहिजे, अशी मागणी आमदार विनायक मेटे यांनी लावून धरली आहे.

भाजपने आता तरी आमच्यावरील अन्याय दूर करावा, असंही विनायक मेटे म्हणाले आहेत. ते एका बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. तेव्हा त्यांनी विधानसभेचा विरोधीपक्ष नेता होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांशीही चर्चा करणार असल्याचंही विनायक मेटे म्हणाले आहेत.

विधानपरिषदेत भाजप विरोधीपक्षात बसल्याने विरोधी पक्षनेते पदाची निवड करावी लागणार आहे. विधानपरिषदेत भाजपचे जे मित्रपक्ष आहेत त्यांमध्ये मी ज्येष्ठ आणि अनुभवी नेता आह. त्यामुळे मला भाजपने विरोधीपक्षनेतेपद द्यावे, असं विनायक मेटे म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्यात महायुतीचंं सरकार आल्याने शिवसंग्रामवर अन्याय झाला आहे आणि आता तरी मला विरोधीपक्षनेतेपद देऊन आमच्यावरील अन्याय कमी करावा, असंही मेटे म्हणाले आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या