बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सरकार पाण्यात बसलेल्या म्हशीसारखं, ढुसणी दिल्याशिवाय हलत नाही”

मुंबई | शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. हे सरकार पाण्यात बसलेल्या म्हशीसारखं आहे. ढुसणी दिल्याशिवाय हलणार नाही, असा टोला विनायक मेटे यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

जेव्हा आम्ही सांगत होतो की SEBCच्या विद्यार्थ्यांना नियुक्त्या द्या. तेव्हा विद्यार्थ्यांना कोर्टात जा म्हणाले आणि आता मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सरकारला जाग आली आहे. याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठा आरक्षण विषय उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही, असं विनायक मेटे यांनी म्हटलं आहे.

5 जूनला बीडमध्येही आंदोलन होईल. मोठ्या प्रमाणात समाज रस्त्यावर उतरेल. मुंबईतही आंदोलन करणार असल्याचा इशारा मेटे यांनी दिलाय. वणवा पेटणार, सरकारला दाखवुन देऊ की मराठा समाजाची ताकद काय आहे, असंही मेटे म्हणालेत. ‘सारथी’चे विद्यार्थी पीएचडी करत आहेत. त्यांना एक दमडीही फेलोशिप मिळाली नाही. 17 तारखेला घरात राहून उपोषण केलं. पण पोलिसांनी त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी पत्र पाठवलं. त्यांना शिकूही देत नाहीत, न्याय देत नाहीत, हे कसलं सरकार?, असा सवाल विनायक मेटे यांनी केला आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं असून राज्य सरकारचा कायदा रद्द केला आहे. तसेच गायकवाड समितीच्या शिफारशीही नाकारण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे.

थोडक्यात बातम्या- 

“मोदी गुजरात दौऱ्यावर तर फडणवीस कोकण दौऱ्यावर, मुख्यमंत्री साहेब तुम्ही मुंबईचा तरी करा”

3 वर्षाच्या चिमुकलीसह विवाहितेची विहिरीत उडी; बुलडाण्यातील मायलेकीच्या आत्महत्येने खळबळ

कोरोना नष्ट करण्यासाठी भाजप नेत्याचा शंखनाद, यज्ञ कुंड घेऊन थेट रस्त्यावर उतरले, पाहा व्हिडीओ

‘दोन हजार दे तुझी गाडी सोडतो’; पोलिसाचा लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; पदोन्नतीतील आरक्षण रद्दचा निर्णय तूर्तास मागे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More