मुंबई | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
अशोक चव्हाण यांच्यासारखा निष्क्रिय माणूस पाहिला नाही. त्यांनी मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे.
2 दिवसांच्या हिवाळी अधिवेशनात सरकारनं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर 5 मिनिटेही चर्चा केली नाही. विधान परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी मुद्दा उपस्थित केला. पण त्यांना आणि मलाही बोलू दिलं नाही. उद्धव ठाकरे म्हणतात मराठा आरक्षण कायम ठेवू. पण कसं ठेवणार यावर कुणीच बोलत नाही. फक्त पोकळ आश्वासन देण्याचं काम सरकार करत आहे, असा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे.
काही मंत्री ओबीसी आणि मराठा समाजात भांडणं लावण्याचं काम करत आहेत, असा गंभीर आरोप मेटे यांनी केला आहे. त्याचबरोबर अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत काहीच केलं नाही, असं विनायक मेटे यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
ठाकरे सरकारला धक्का! कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचं काम थांबवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
“गप बसून उपमुख्यमंत्रिपद भोगलं असतं तर काय वाटलं नसतं पण इतक्या अभिमानाने हा माणूस कसा वागू शकतो?”
नवरीसारखा श्रृंगार करत आपल्या पोटच्या मुलांसोबत महिलेने केलं धक्कादायक कृत्य!
“राज्यातील दोन दिवसाचं अधिवेशन आठवं आश्चर्य तर केंद्राने रद्द केलेलं अधिवेशन हे कितवं आश्चर्य”
चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याच्या मागणीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले…