बीड महाराष्ट्र

“आरक्षणाबाबत लवकर निर्णय घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा, अन्यथा….”

बीड | शिवसेना हा आरक्षणाला विरोध असणारा पक्ष असून, या पक्षाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणीवपूर्वक विरोध करत आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी आणि थोरात यांची काँग्रेस हे प्रस्थापित लोकांचे पक्ष आहेत. यांना विस्थापित मुलांना प्रवाहात येऊ द्यायचं नाही. गरीब मराठा युवकांची वाताहत या तीन पक्षांच्या सरकारमुळे झाल्याचं शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंंनी म्हटलंय.

विनायक मेटेंनी बीड येथील शिवसंग्राम भवन येथे पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना मेटेंनी विविध विषयांवर भाष्य केलं.

राज्य सरकारने आरक्षणावर लवकर निर्णय घ्यावा, समाजाला न्याय द्यावा, अन्यथा समाजाला रस्त्यावर पुन्हा उतरण्याशिवाय पर्याय नसेल, असा इशाराही मेटेंनी दिला.

राज्यभरातील मराठा संघटना, समन्वयकांमध्ये सध्या एकवाक्यता दिसून येत नाही. या एकवाक्यतेसाठी सर्वांना एका व्यासपीठावर घेऊन आरक्षण आंदोलनात छत्रपती उदयनराजेंनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन आमदार विनायक मेटे यांनी केलंय.

महत्वाच्या बातम्या-

मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, आंदोलनाच्या तारखा केल्या जाहीर

‘या’ माजी आमदाराचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे विद्यापीठाचा अंतिम वर्षाच्या परीक्षेचा आराखडा जाहीर

पुण्यातील ‘या’ सोसायटीमध्ये एकही कोरोना रुग्ण नाही

…म्हणून मी काँग्रेस पक्ष सोडला- उर्मिला मातोंडकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या