औरंगाबाद | सेना-भाजपची युती तुटल्यापासून भाजपसोबत एकही मोठा मित्रपक्ष राहिलेला नाही. अशातच भाजपच्या आणखी एका मित्रपक्षाने स्वबळाचा नारा देण्याचा इशारा दिला आहे.
भाजपने सन्मानजनक वागणूक दिली तर युती करू नाहीतर स्वबळावर निवडणूक लढवायची आहे, असं शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांनी सांगितलं आहे.
औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसंग्राम उतरणार आहे. युती झाली किंवा नाही झाली तरी येथे दोन आकडी नगरसेवक निवडून आणल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही विनायक मेटे यांनी केला. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेला औरंगाबादच्या नामंतरावरून टोला लगावला आहे.
दरम्यान, सामनामध्ये किंवा सोशल मीडियात संभाजीनगर लिहिल्यामुळे शहराचं नामांतर होणार नाही. त्यासाठी नोटिफिकेशन काढावं लागतं असल्याचं मेटे म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
पुण्यात नवरदेवाच्या बापानं चक्क मेव्हणीचेच दागिचे चोरले, अन् लग्नात…
‘आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा’; प्रकाश आंबेकरांची मागणी
सर्वात मोठा निकाल!! गुटखा विक्री करणाऱ्याला आता 10 वर्षे शिक्षा!
‘शेतकरी आंदोलनामुळे ‘बर्ड फ्लू’ पसरत आहेत’; भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
50 वर्षीय विधवेवर सामूहिक बलात्कार; नराधमांनी केलेला प्रकार ऐकून काळजाचा थरकाप उडेलृ