मुंबई | राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात अन्न सुरक्षा व मानकांचे विधेयक सभागृहात आज चर्चिले गेले होते. यावेळी सभागृहात आमदार मेटे यांनी आयुक्तांचे तक्रार आणि अधिकार काढून हे सरकार स्वतःकडे घेत असल्याबाबत खरपूस समाचार घेतला.
सध्या अन्नामध्ये भेसळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या अनुषंगाने काही कठोर उपाययोजना असायला हव्या असताना सरकार या विभागाच्या आयुक्तांचे अधिकार काढण्यावर लक्ष देत आहे. आयुक्तांचे अधिकार शासनाकडे घेण्याचे हे विधेयक असल्याचे आ मेटे यांनी आरोप केला. हे सरकार उलट्या दिशेने का जात आहे?, असा सवाल करत मेटे यांनी सरकारवर निशाणा साधला.
जिथे एक खिडकी योजना होती तिथे आता २ खिडक्या केल्या जात आहेत मग येत्या काळात 3 पक्षांच्या 3 खिडक्या सुरु करायला हवात, असा टोला देत त्यांनी प्रशासनातील आयुक्तांच्या निर्णयाबद्दल का संशय असावा असा प्रश्न करत आज आर आर आबांची आठवण येते, ते प्रशासनाला अधिकार देत होते अन तुम्ही मात्र ते काढत स्वतःकडे घेत आहात, असं म्हणत मेटेंनी सरकारवर टीकास्त्र सोडलं.
दरम्यान, सरकारची ही पद्धत अत्यंत पद्धत चुकीची असून सरकार स्वतःकडे सर्वाधिकार घेऊन इच्छित असून अंतिम निकाल आपलाच हवा हि हकेखोरी करत असल्याचं मेटे या बिलाच्या चर्चेवेळी म्हणाले.
ट्रेंडिंग बातम्या-
भाजपचं वर्तन हे कोरोना व्हायरसपेक्षाही भयानक- अशोक चव्हाण
कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट अन् शिक्षणमंत्री म्हणतात पेपर फुटलाच नाही
महत्वाच्या बातम्या-
प. बंगालमध्ये राहणारा प्रत्येक बांगलादेशी भारतीय नागरिक- ममता बॅनर्जी
कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट अन् शिक्षणमंत्री म्हणतात पेपर फुटलाच नाही
विवाहित पुरुषांवर प्रेम करु नका; नीना गुप्तांचा तरुणींना सल्ला
Comments are closed.