बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धव ठाकरे दिल्लीतून हात हलवत आले, मुख्यमंत्र्यांच्या मनात पाप”

मुंबई | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच पेटलेलं दिसत आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यावर भाजपनेही सरकारवर टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आपल्या शिष्टमंडळासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. या भेटीवरून शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

मराठा आरक्षणावरून उद्धव ठाकरेंनी यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मात्र त्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली किंवा मराठा समाजाला काय मिळालं. मुख्यमंत्र्यांनी अद्यापपर्यंत सांगितलं नाही. त्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलावं, असं विनायक मेटे म्हणाले. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री आणि पंतप्रधान भेटीत मराठा आरक्षणाबद्दल नेमकी काय चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं नाही. तेथून हात हलवत आले असून, त्यांच्या मनात पाप आहे असल्याची खोचक टीका मेटेंनी केली.

दरम्यान, येणाऱ्या काळात राज्यातील अनेक ठिकाणी बैठका, मोर्चे आयोजित करणार असून सरकारला जाब विचारणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यात  तारखेला पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याचं मेटेंनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता; महाराष्ट्रातून कोणाची वर्णी लागणार?

“संभाजीराजे छत्रपती हे मान्य करत नसले तरी ऑन पेपर ते भाजपचेच खासदार”

‘या’ एका व्यक्तीनं तयार केली मॅच विनर्सची फौज; बदलली आहे टीम इंडिया

देशात दीड हजारांच्या जवळपास डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू; मृतांमध्ये इंटर्न डॉक्टरांचाही समावेश

“मोदी सरकारमुळेच मुंबई तुंबली अन् हिंदमाता येथे पाणी साचलंय त्याला स्मृती इराणी जबाबदार”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More