Top News औरंगाबाद महाराष्ट्र

“सामनात किंवा सोशल मीडियात संभाजीनगर लिहून नाव बदलत नाही त्यासाठी…”

औरंगाबाद | औरंगाबादच्या नामंतरावरून सध्या शिवसेना मोठी पेचात पडली आहे. महाविकास आघाडीत सत्तेत असलेल्या काँग्रेसने नामंतराला विरोध केला आहे. काँग्रसने विरोध केला तरी शिवसेनेने आपल्या शासकीय ट्विटर हँडलवर औरंगाबादचा संभाजीनगर उल्लेख केला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटेंनी शिवसेनेवर टीका केली आहे.

सामना दैनिकात किंवा सोशल मीडियात संभाजीनगर लिहिलं म्हणजे नाव बदलत नाही. त्यासाठी नोटिफिकेशन काढावं लागतं. नोटिफिकेशन काढा आणि मग बघा काँग्रेस विरोध करतं का?, असं विनायक मेटेंनी म्हटलं आहे.

आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं पाहायचं वाकून अशी स्थिती शिवसेनेची झाली आहे. लोकांना एकमेकांच्या अंगावर घालण्याचं काम शिवसेना करत असल्याची टीका मेटेंनी केली आहे.

दरम्यान, अशोक चव्हाण मराठा आरक्षणाबाबतीत सगळीकडे अपयशी ठरले आहेत. अशोक चव्हाणांमुळे मराठा समाजावर वाईट वेळ आली असल्याचंही मेटे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव! भारताच्या ‘या’ खेळाडूंवर वर्णद्वेषाची टीका, तक्रार दाखल

‘मुख्यमंत्र्यांनी शहरांची नाव बदलण्यावर जोर देण्याऐवजी सरकारी दवाखान्यांकडे …’; काँग्रेस नेत्याचा ठाकरेंवर निशाणा

“बाळासाहेबांच्या जयंती दिवशी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावं”

या आईचा हंबरडा तुमच्या काळजाचं पाणी पाणी करेल का???

भंडाऱ्यातील मन सुन्न करणाऱ्या घटनेवर मोदीही हळहळले; म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या