बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सगळा गाढवपणा हा सरकारनं केला आहे अन्…”; विनायक मेटेंचा राज्य सरकारवर घणाघात

पुणे | मराठा आरक्षण रद्द झाल्यापासून वेगवेगळ्या स्तरावर नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे. ‘मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सगळा गाढवपणा हा सरकारनं केला आहे. सरकारच्या नाकर्तेपणा विरोधात आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता मोर्चा हा मुक मोर्चा नसेल, तो बोलका असेल, आम्ही सळो की पळो करून सोडणार’ अशा शब्दांत मराठा संघटनेचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी टीका केली आहे.

‘सारथी संस्थेमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. पीएचडी करणाऱ्या 239 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मागील एक वर्षापासून विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळाली नाही. विद्यार्थी संकटात आहेत, एमफील करणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्र शासनानं एमफील बंद केल्यामुळे पीएचडी करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी आहे. 1 जूनला विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात येईल, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे’, अशी माहिती मेटे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना दिली. तर, महाविकास आघाडी सरकारवर त्यांनी जोरदार टीकाही यावेळी केली.

‘बार्टीच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना सारथीतही मदत करावी. सारथीत 5 ते 6 कर्मचारी आहेत. 139 कर्मचारी कामावर घेण्याचे अधिकार मिळाले आहेत, इथं भरती केली जाईल. अजित पवारांना विचारले असता त्यांनी आज सारथीच्या अध्यक्षांना याबाबत सांगितलं आहे. सारथी संस्थेला स्वतःची जागा मिळवुन देण्याचं काम अजित पवारांनी केलं आहे. अजित पवारांनी 41 कर्मचारी अधिकारी भरण्यास मान्यता दिली आहे’, असंही मेटे यांनी सांगितलं आहे. तसेच, ‘काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांना ओबीसीचा नेता होण्याची घाई झाली आहे. त्यांच्या बोलण्याला काही किंमत नाही’, असा टोलाही मेटे यांनी लगावला आहे.

दरम्यान, ‘मराठा आरक्षणाबाबत 5 जूनला पहिला मोर्चा बीडमध्ये निघणारच’, अशी ठाम भूमिका आमदार विनायक यांनी घेतली आहे. या अनुषंगाने बीडमध्ये मोर्चाच्या पूर्वतयारीची बैठक रविवारी संपन्न झाली. या बैठकीला जिल्ह्यातील निवडक मराठा समन्वयकांची हजेरी होती. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर बीडमध्ये मराठा समाजाचा रोष व्यक्त करण्यासाठी 5 जून रोजी पहिला मोर्चा होत आहे. या मोर्चाची तयारी सुरू असून 5 तारखेला मोर्चा होणारच, असा ठाम विश्वास मेटे यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवला.

थोडक्यात बातम्या –

कौतुकास्पद! हॉस्पिटलमधील पगाराची नोकरी सोडून स्मशानात करते असं काम की तुम्हालाही वाटेल अभिमान

खोटं वय सांगून केलं प्रेम, अल्पवयीन मुलाचे शरिरसंबंध अन् पुढे घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

“फोन परत द्या, मोबाईलमध्ये माझ्या आईच्या आठवणी आहेत”; 9 वर्षाच्या मुलीचं भावनिक पत्र

चिंताजनक! ब्लॅक फंगसपेक्षाही धोकादायक असलेल्या ‘येलो फंगस’ चा पहिला रूग्ण सापडला!

तुमचा जिल्हा रेड झोनमध्ये तर नाही ना?; जाणून घ्या रेड झोनमधील जिल्हे एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More