बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“… आणि तोपर्यंत देवेंद्र फडणवीसांचा थयथयाट असाच सुरू राहिल”

औरंगाबाद | शिवसेनेच्या (Shivsena) शिवसंपर्क अभियानाला मंगळवारपासून सुरूवात झाली. यात सेनेचे खासदार विदर्भ व मराठवाड्याच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असणार आहेत. शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) शिवसंपर्क अभियान अंतर्गत औरंगाबादेत आहेत.

विनायक राऊत यांनी औरंगाबाद येथे बोलताना विधानसभचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. देवेंद्र फडणवीसांचं जनाब सेनेबद्दलचं वक्तव्य निंदनीय असून आम्ही त्याचा धिक्कार करतो, असं वक्तव्य विनायक राऊत यांनी केलं.

महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) यशामुळे देवेंद्र फडणवीसांचा थयथयाट होत आहे आणि 2029 पर्यंत हा थयथयाट असाच सुरू राहिल, असा घणाघात विनायक राऊत यांनी केला आहे. तर देवेंद्र फडणवीसांना आता देवेंद्र मिया असं म्हटलं पाहिजे, असा टोला देखील विनायक राऊत यांनी गावला आहे.

दरम्यान, बाळासाहेबांचा जनाब या नावाने उल्लेख करून अवमान करण्याचं पाप फडणवीसांनी केलं आहे, त्यांचं हे वाक्य क्षम्य नाही. त्यामुळे आम्ही देवेंद्र फडणवीस यांचा धिक्कार करतो, असं म्हणत विनायक राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! हिरानंदानी ग्रुपवर आयकर विभागाचा छापा

“ज्यांचा आदर्श दाऊद आहे त्या मटण करींना छत्रपतींबद्दल बोलण्याचा अधिकारच नाही”

महागाईचा भडका, पेट्रोल-डिझेल पाठोपाठ घरगुती गॅस सिलेंडर महागलं

कोरोना व्हायरसबद्दल तज्ज्ञांनी केलेल्या धक्कादायक दाव्याने खळबळ

मोठी बातमी! पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ, जाणून घ्या आजचे ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More