Top News

“ड्रायव्हर मुख्यमंत्री चालेल, नारायण राणे सारखा डराव डराव करणारा बेडूक नको”

सिंधुदुर्ग | विकासाकडे घेऊन जाणारा ड्रायव्हर मुख्यमंत्री आम्हाला चालेल. मात्र नारायण राणे सारखा डराव डराव करणारा बेडूक आम्हाला नको, अशी टीका शिवसेना नेते विनायक राऊत यांनी भाजप नेते नारायण राणेंवर केलीये.

नारायण राणे म्हणजे नेमकं रसायन काय हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. त्यामुळे राणेंच्या बकवासगिरीला उत्तर देण्याची आम्हाला गरज नाही, असं म्हणत विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर निशाणा साधलाय.

मराठा संघटनांमध्ये जे पदाधिकारी आहेत त्यांना वस्तूस्थितीची चांगली कल्पना आहे. मात्र, भाजप पुरस्कृत जो एक गट आहे त्यांना अशा प्रकारची अवदसा आठवत आहे, असं विनायक राऊत म्हणाले.

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे. सरकार ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडणार. मात्र भाजपने सत्तेत असताना नेमके काय दिवे लावले?, असा सवाल  विनायक राऊत यांनी केला.

महत्वाच्या बातम्या-

पंजाब-हरयाणातील शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक देणं दुर्दैवी- संजय राऊत

शेतकरी पाकिस्तानी नाहीत, केंद्रानं त्यांचं ऐकावं- अण्णा हजारे

“खासदार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बाहेरून आलेलं म्हणणं ही शोकांतिका”

दुसऱ्या वनडे सामन्यातही ऑस्ट्रेलियाकडून भारताचा धुव्वा; टीम इंडियाने मालिकाही गमावली

“हे सरकार आहे की तमाशा? कोण काय करतं ते दुसऱ्याला माहीत नसतं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या