मुंबई | शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. सत्ता हातूतन गेल्याने त्यांचा जळफळाट होत असल्याचं विनायक राऊत यांनी म्हटलंय.
एका पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना विनायक राऊत म्हणाले, “दिल्लीतील काही भाजप नेत्यांनाच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून नको होते. त्यांना ‘मी’ पणाचा जो गर्व चढला होता याशिवाय दिल्लीतील नेतृत्वाचीही स्वप्नं पडत होती. याच कारणाने दिल्लीतील नेत्यांनी त्यांचा काटा काढला.”
“संघ आणि भाजपमध्ये मी पणाची भाषा चालत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी थेट ‘मी’ पणाची भाषा सुरू केली होती. जी भाषा दिल्लीतील काही नेत्यांना रूचली नाही,” असं विधानही विनायक राऊत यांनी केलंय.
“भाजपमधील देवेंद्र फडणवीस पुरस्कृत टवाळखोरांची विकृतबुद्धी महाराष्ट्र आणि राज्य सरकारची बदनामी करतंय. सत्ता हातातून गेल्याने ते असे विकृत चाळे करत असल्याचा,” आरोपही राऊत यांनी केलाय.
महत्वाच्या बातम्या-
दिल्ली सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची होणार कोरोना चाचणी
टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूच्या कुटुंबियांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
मुंबईकरांसाठी 15 डिसेंबरनंतर लोकलसेवा सुरु करण्याचा सरकारचा विचार!
“धुळे नंदुरबारच्या निकालावरून महाविकास आघाडीचे उद्याचे भविष्य काय राहील हे स्पष्ट होतं”
राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्त्व कुणाकडे?; शरद पवार यांनी सांगितली ‘ही’ तीन नावं