बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जो कोणी चुकला असेल त्याला क्षमा करणार नाही”

मुंबई | संजय राठोड यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी जमवून केलेलं शक्ती प्रदर्शन हे चुकीचं होतं असं शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी बोलून दाखवलं आहे. पोहरादेवी येथे जमलेल्या गर्दीवरून चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई होईल असं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. सर्वांना समान न्याय देण्याचं धोरण मुख्यमंत्र्यांचं आहे त्यामुळे या प्रकरणात कोणीही सुटणार नाही.

पोहरादेवी येथे जमलेल्या गर्दीमुळे उद्धव ठाकरे हे संजय राठोड यांच्यावर नाराज आहेत की नाही ते मला माहिती नाही. पण या प्रकरणात जो कोणी चुकला असेल त्याला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे आणि ती होणारच, मुख्यमंत्री कोणालाही माफ करणार नाहीत, असं एका वृत्तवाहिनीशी बोलताना शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्री कायदा मोडल्यास जवळच्या व्यक्तिलाही सोडत नाहीत असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. सर्वांना समान न्याय मिळेल आणि दोषींवर कारवाई होईल असे सध्या शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना नुकतीच फक्त 2 मिनिटे भेटण्याची वेळ दिली त्यामुळे, आता मुख्यमंत्र्यांची नाराजी दिसून येत आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण आणि पोहरादेवी गर्दी जमवून केलेले शक्ती प्रदर्शन यावरून मुख्यमंत्री आता संजय राठोड यांच्यावर कारवाई करतील अशी चिन्हं दिसत आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘होय, आम्हीच कोरोना पसरवला’; अखेर तबलिगींनी दिली कबुली

पिंपरीत सातव्या मजल्यावरुन पडून 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू!

तरूणाने गळा दाबून केली मैत्रिणीची हत्या; हत्येचं कारण ऐकून पोलीसही हादरले

कोरोना लसीकरणाबाबत प्रकाश जावडेकरांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

भेटीसाठी थांबलेल्या संजय राठोडांना मुख्यमंत्र्यांनी दिला अवघ्या 2 मिनिटांचा वेळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More