सिंधुदुर्ग | नितेश राणे यांनी एका व्यक्तीला 12 कोटींचा गंडा घातला आहे. त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुरुंगात टाकणार होते, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.
ही केस पुन्हा उघडली तर नितेश राणे तुरुंगात जातील, असा दावा विनायक राऊत यांनी केला आहे. ते सिंधुदुर्गमध्ये माध्यमांशी बोलत होते.
या गुन्ह्याप्रकरणी फडणवीस हे नितेश राणेंना तुरुंगात टाकणार होते. पण नारायण राणे भाजपला शरण गेले. त्यामुळे ती केस थांबली, असं विनायक राऊत यांनी म्हटलंय.
आम्ही मनात आणलं तर ती केस एका दिवसात ओपन होऊ शकते. ती एक ओपन झाली तर दुसऱ्याच महिन्यात नितेश राणे तुरुंगात गेल्याशिवाय राहणार नाहीत, असं राऊत म्हणाले.
थो़डक्यात बातम्या-
“खरं तर सत्तारांचे केसच उगवू देणार नव्हतो, पण आता टोपी निघू देणार नाही”
‘थोडं राजकारण कमी करा आणि…’; भंडाऱ्यातील दुर्घटनेनंतर सामनातून राऊतांचा केंद्राला सल्ला
धक्कादायक! परराज्यातून आलेल्या तरुणीवर औरंगाबादेत सामूहिक बलात्कार
…नाहीतर त्यांच्या पेकाटात लाथ घातली पाहीजे- आशिष शेलार
“ये पब्लिक सब जाणती है, सुरक्षा कमी करणं हा सरकारचा खुजेपणा”