बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गोपीनाथ मुंडे आणि महाजनांच्या काळातील भाजप आता उरलेला नाही”

मुंबई | शिवसेनेला वाटतं की आम्ही माहीममध्ये आल्यावर सेना भवन फुटेल. त्यांना सांगतो की वेळ आली तर आम्ही ते सुद्धा करू, असं वादग्रस्त वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं. यानंतर शिवसेेना नेत्यांनी प्रसाद लाड यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी देखील प्रसाद लाड यांच्यासह भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

गोपीनाथराव मुंडे आणि प्रमोदजी महाजन चंद्रकांत पाटील यांची भाजप राहिलेली नाही. तर प्रसाद लाड, नितेश राणे सारख्या भांडग्यांची भाजप झालेली आहे, अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे.

माहीमपासून शिवसेना भवन चालण्याचा जो काही कोल्हेकुई करतात त्यांना त्या ठिकाणी गाडण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे, मुंबईकरांमध्ये आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं, असा इशाराही राऊतांनी नितेश राणेंना दिला आहे.

हे भांडगे लोक आता खूप भुंकायला लागलेले आहेत. या भुंकणाऱ्या लोकांचं तोंड बंद करायला शिवसेनेला फारसा वेळ लागणार नाही. परंतु भाजप नेत्यांनी त्यांची तोंडे बंद केली तर भविष्यकाळ आहे अन्यथा या भांडग्यांच्या संगे भाजप सुद्धा संपून जाईल, अशा शब्दात विनायक राऊत यांनी प्रसाद लाड यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

थोडक्यात बातम्या-

राजकीय गांजाडयांना शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपल्या शिवाय राहणार नाही- संजय राऊत

‘या’ नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि जाणून घ्या आपल्या पीएफ खात्यातील रक्कम

‘मुंबई पोलिसांनी माझ्याकडे…’; गहना वशिष्ठचा खळबळजनक आरोप

“ते बाळासाहेबांचं शिवसेना भवन राहिलं नाही, आता ते कलेक्शन ऑफिस झालंय”

‘लोकांनी गोमांस अधिक खायला हवं’; ‘या’ भाजप मंत्र्याचं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More