बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आघाडी केली म्हणजे आघाडीत आलंच पाहिजे असं काही नाही, कुणालाही कसलं बंधन नाही”

मुंबई | राज्याच्या राजकारणाची दिशा बदलून टाकणारी घडामोड 2019 मध्ये घडली होती. कायम विरोधात असणारे एकत्र येऊन सत्ता स्थापन करत होते. महाविकास आघाडी (MVA Govenment) सरकारच्या माध्यमातून आज शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी काॅंग्रेस (NCP), काॅंग्रेस (Congress) हे एकत्र आहेत. मात्र त्यांच्या नेत्यांमध्ये कायम दुरावा पाहायला मिळतो. आताही राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या एका वक्तव्यानं महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर आला आहे.

राष्ट्रवादीला आघाडीचे सर्व पर्याय शिल्लक आहेत. भाजप आमच्यापासून दूर नाही, असं वक्तव्य आव्हाड यांनी केलं होतं. यावर शिवसेनेतर्फे खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आघाडी केली म्हणजे 100 टक्के आघाडीत आलंच पाहीजे असं नाही. कोणाला कसलही बंधन नाही, असं वक्तव्य राऊत यांनी केलं आहे.

जितेंद्र आव्हाड आणि भाजपमध्ये किती जवळीक आहे हे मला माहिती नाही. पण जितेंद्र आव्हाड एक हुशार आणि चांगले नेते आहेत, असंही राऊत म्हणाले आहेत. स्थानिक पातळीवर निवडणुका एकत्र लढवण्याबाबत काही मतभेद असू शकतात. पण मोठया निवडणुका एकत्रितच लढवण्यात याव्यात असं सर्वांचं एकमत आहे, असंही राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, विनायक राऊत हे कोकणातील शिवसेनेचे महत्त्वाचे नेते मानले जातात. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ते कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. कोकणातील राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष सुद्धा महाराष्ट्राला परिचित आहे.

थोडक्यात बातम्या 

“किरीट सोमय्या यांना ईडीचा अधिकृत प्रवक्ता घोषित करावं”

मी पवारसाहेबांना खुर्ची का दिली हे समजायचं असेल तर…- संजय राऊत

वाद तिरंगा रॅलीचा; सरकार आणि एमआयएममध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी एका क्लिकवर

भारती म्हणते, ‘Are We Positive?’; व्हिडीओ शेअर करत दिली गुड न्यूज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More