महाराष्ट्र सिंधुदुर्ग

“नाणारच्या जमिनी शेतकऱ्यांना परत देणार, जमीन खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार रद्द करणार”

सिंधुदुर्ग | नाणारमधील शेतकऱ्यांनी विकलेल्या जमिनी त्यांना परत देण्यात येणार आहे. नाणार प्रकल्पासाठी जमिनी खरेदी-विक्रीचे करण्यात आलेले सर्व व्यवहार रद्द करण्यात येणार असल्याचा दावा शिवसेना नेते विनायक राऊत यांनी केला आहे.

देवगडमध्ये एका कार्यक्रमात विनायक राऊत बोलत बोलत होते. नाणार रिफायनरी प्रकल्प कुठल्या परिस्थितीत होणार नाही, असं राऊत यांनी स्पष्ट केलंय.

नाणार प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी 7 लाख रुपये एकराने त्यांच्या जमिनी विकल्या. हा प्रकल्प झाला तर त्याचे मूल्य 90 लाख एकरी होणार आहे. दलालांनी जमिनी लाटून शेतकऱ्यांची लुबाडणूक केली आहे. 224 गुजराती आणि मारवाडी लोकांनी या जमिनी विकत घेतल्या आहेत. त्यामुळे हे सर्व व्यवहार रद्द करण्यात येईल, असं विनायक राऊत यांनी सांगितलंय.

नाणार प्रकल्प घोषित केल्यानंतर नाणारमध्ये 2200 एकर जमीन खरेदी करण्यात आली. तर अध्यादेश निघाल्यानंतर 800 एकर जमिनीची खरेदी झाली होती. हे व्यवहार संशयास्पद असल्याने त्याची चौकशी करण्यासाठी सरकारने आधीच चौकशी समिती बसवली आहे. त्यामुळे नाणारमधील जमीन खरेदीचे सर्व व्यवहार रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

“राज्य सरकारने उठसूट कोणतीही गोष्ट केंद्र सरकारवर ढकलणं बंद केलं पाहिजे”

काँग्रेसने नामकरणाला विरोध केल्यामुळे महाविकास आघाडीवर परिणाम नाही- संजय राऊत

पुण्यात धक्कादायक घटना!; काॅलसेंटरमधून घरी चाललेल्या तरुणीला रस्त्यात अडवून बलात्कार

शेतकऱ्यांशी बोलायला पंतप्रधानांना अपमान वाटतो- हसन मुश्रीफ

कोरोनाची लस कुण्या पक्षाची नाही, मी आनंदाने घेईन- ओमर अब्दुल्ला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या