बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘नारायण राणेंना कावीळ झाली, पनवती म्हणून भाजपने त्यांना…’; राणेंच्या टीकेला शिवसेनेचं चोख प्रत्युत्तर

मुंबई | तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या कोकण दौऱ्यावरून नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. राज्यासाठी हे मुख्यमंत्री लायक नसल्याचं राणे यांनी म्हटलं होतं. उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला शिवसेेनेचे नेते आणि खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपने पनवती म्हणून राणेंना अडगळीत टाकलेलं आहे. त्यांना कावीळ झालेली आहे. ते अजून कोकणातही गेलेले नाहीत. भ्रष्टाचाराचा महामेरू म्हणून राणेंचा उल्लेख होतो. त्यांच्या रुग्णालयात आरटी-पीसीआर चाचणीसाठी जास्तीचे पैसे घेतले जात आहेत. भूखंड हडप करणारा म्हणजे नारायण राणे, अशा शब्दात विनायक राऊतांनी टीका केली आहे.

‘मातोश्री’त शांती यज्ञ घालण्याचा सल्ला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला होता. त्यावरही विनायक राऊत यांनी निशाणा साधला. “राणेंनी इतरांना सल्ला देऊ नये. आधी स्वत:च्या घरात शांती घालावी. वर्षा व मातोश्री ही दैवतांची घरे आहेत. त्यावर बोलणं त्यांना शोभत नसल्याचं विनायक राऊत म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री चिवला बीचवर आले होते. तिथे माझं घर आहे. राणेंचं घर कसं दिसतं हे बघायला आले असतील. ते चिवला बीचवर येणार आहेत हे माहीत असतं तर मी थांबलो असतो. त्यांना घरी बोलावून नारळपाणी दिलं असतं, असा टोलाही राणेंनी उद्धव ठाकरेंना हाणला.

थोडक्यात बातम्या- 

‘मैनू काला चष्मा जचता है’ म्हणत नवरीची लग्न मंडपात धमाकेदार एन्ट्री, पाहा व्हायरल व्हिडीओ

पत्नीच्या फोटोवरुन नवा वाद; इरफान म्हणतो, मी तिचा मालक नाही!

होम आयसोलेशन बंद या राज्य सरकारच्या निर्णयावर पुणे महापालिकेने दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

प्रेयसीने प्रियकराच्या घरासमोर घेतला शेवटचा श्वास; ह्रदय पिळवटून टाकणारी घटना!

…..म्हणून लसीकरण प्रमाणपत्र सोशल मीडियावर शेअर करु नका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More