मुंबई | राज्य सरकारने विरोधी पक्ष आणि इतर राजकीय नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी माझ्या जिवाचं काही बरं-वाईट झाल्यास त्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचं भाजप नेते नारायण राणेंनी म्हटलं होतं. यावरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंना टोला लगावला आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे तर केंद्रात त्यांच्या पक्षाचे सरकार आहे. मात्र कोणतंही सरकार असलं तरी राणेंना त्यांच्या मुलांपासूनच खरा धोका असल्याचं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.
निलेश आणि नितेश दोघेही गुंड प्रवृत्तीचे आहेत. निलेश राणेला मतदारांनी घरी बसवलं. नितेश राणेकडे चांगले गुण असल्यामुळे तो पुढे जाईल असं वाटत होतं. मात्र त्यांची गुंडप्रवृत्ती त्यांना घरात बसविल्याशिवाय राहणार नाही, असंही राऊत यांनी म्हणाले.
दरम्यान, विनायक राऊतांच्या या तिखट प्रतिक्रियेवर राणे कुटुंबातील कोण प्रत्युत्तर देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या-
“आमदारकीसाठी बारामतीला जाऊन आमरस अन् गोड चहा घेणं सोडा”
देशांतर्गत वापरासाठी पुण्याहून सिरमच्या कोरोना वॅक्सिनची पहिली बॅच रवाना
नितेश राणे हे पहिले हँग ते चाराण्यासारख्या गोष्टी करतात- अब्दुल सत्तार
वरुण द्या, खालून द्या…, मनात असेल त्यांना सुरक्षा द्या- देवेंद्र फडणवीस
थोरली CA तर धाकटी UPSC उत्तीर्ण, भाजप खासदार ओम बिर्ला यांचं शिक्षण किती?