मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपसोबत संयुक्त युती करत सरकार स्थापन केलं. पण अजून त्यांच्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. दोन मंत्री राज्य सांभाळत असल्याने आता विरोधी पक्ष त्यांच्यावर सडकून टीका करत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीला 15 दिवस उलटूनही खातेवाटप झालं नाही. खातेवाटपासंबंधी चर्चेसाठी दिल्ली दौरा सुद्धा झाला आहे.
एकनाथ शिंदे हे शिक्क्याचे मुख्यमंत्री असून सर्व कारभार भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) पाहतात असं चित्र सध्या दिसत आहे. कारण गेले काही दिवस माध्यमांच्या कॅमेऱ्यात असे अनेक क्षण टिपले गेले आहेत. मुख्यमंत्री बोलत असताना त्यांचा माईक ओढणे, पत्रकार परिषदेत नावांच्या चिठ्ठ्या देणे, विधानसभेतील भाषणात इशारा करत भाषण पुरे करा सांगणे आदी.
यावर आता शिवसेनेचे नेते आणि खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी टीका केली आहे. हे सरकार सहा महिने टिकलं तर नशीब असं म्हणत आज माईक काढून घेतला उद्या पँट काढून घेऊन नागडे करतील यांना, आज जे बंडखोर आहेत यांना यापुढे राजकीय आयुष्य नाही, असा घाणाघात राऊतांनी केला. ते कोल्हापूरात पत्रकारांशी बोलत होते.
अजित पवारांनी (Ajit Pawar) सुद्धा यावरुन भाजप शिंदे यांना डिवचलं. सत्ता येत जात रहाते, सत्तेचा ताम्रपट कोणीही घेऊन आलेले नाही. हे सरकार किती दिवस चालेल हे सांगता येत नाही. आज माईक ओढला उद्या काय काय ओढतील याचा भरोसा नाही, असं अजित पवार म्हणाले. दोघांचं सरकार चाललंय, मंत्रीमंडळ विस्तार करायला हे लोक का घाबरतात?, असा प्रश्न देखील पवारांनी यावेळी विचारलाय.
थोडक्यात बातम्या –
“बिचाऱ्या मुख्यमंत्र्यांची मला फार काळजी वाटते, त्यांच्या मागे खूप मोठं षडयंत्र”
“मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री राज्याचा भार वाहत असताना राज्यपाल समुद्राच्या लाटा मोजतायत का?”
ललित मोदींच्या प्रेमात पडण्यापूर्वी सुष्मिताच्या ‘या’ 10 अफेअर्सचीही रंगली होती खूप चर्चा
मातोश्रीचे पूर्वीचे दिवस गेले म्हणत मनसेची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
‘सुरूवातीलाच अशी ओढाओढ चिठ्ठ्या देणं सुरू झालं, पुढे पुढे तर…’; अजित पवारांची बोचरी टीका
Comments are closed.