नवी दिल्ली | भारताची सुवर्णकन्या विनेश फोगाटने भारतात पाऊल ठेवताच साखरपुडा उरकला आहे. शनिवारी रात्री मायदेशात परतल्यानंतर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारताचा कुस्तीपटू सोमवीर राठीने विनेशला अंगठी घातली.
आशियाई स्पर्धेत कुस्तीत सुवर्ण मिळवणारी ती पहिलीच भारतीय महिला आहे. विमानतळावर स्वागतासाठी तिच्या गावातील असंख्य लोकांनी गर्दी केली होती. त्याच दिवशी तीचा वाढदिवस असल्याने तिने तिथेच केकही कापला. यावेळी विनेशची आई आणि सोमवीरचे नातेवाईक उपस्थित होते.
दरम्यान, लग्नाच्या चर्चेला दुजोरा देत आपण लवकरच लग्न करणार असल्याचंही विनेशने सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-खासदार दिलीप गांधी श्रीपाद छिंदमला पाठीशी घालत आहेत का?
-नीरजच्या भाल्याचा नेम हजार नंबरी; साधला विक्रमी ‘सुवर्ण’वेध!
-सत्तेतून भाजपला घालवू, मगच पंतप्रधान कोण त्याचा विचार करू!
-दारूड्या पोराला तर बापही नाकारतो; जितेंद्र आव्हाडांचं सनातनवर टीकास्र
-निवडणुकांसाठी मतपत्रिकाच वापरा; शिवसेनेसह 17 राजकीय पक्षांची मागणी
Comments are closed.