विनेश फोगाटला मेडल मिळणार?, अपात्रतेच्या सुनावणीत काय घडलं?

Vinesh Phogat | भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून (Paris Olympics 2024) अपात्र ठरवल्यानंतर भारतीयांची मोठी निराशा झाली. जगभरातून यावर प्रतिक्रिया उमटल्या. विनेशने महिला कुस्तीच्या 50 किलो गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, तिचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याने तिला स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आलं. यानंतर विनेश फोगाटने (Vinesh Phogat) तिला रौप्य पदक देण्यासाठी सीएएसकडे आवाहन केले होते.

विनेश फोगटच्या वतीने ज्येष्ठ वकील हरीश साळवे हा खटला लढवत आहेत. काल (9 ऑगस्ट) याबाबत झालेल्या सुनावणीत हरिश साळवे यांनी जोरदार युक्तीवाद केला. हरीश साळवे यांनी जवळपास 1 तास 10 मिनिटे आपली बाजू मांडली. या युक्तीवादमध्ये महत्वाचे 4 मुद्दे मांडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

हरीश साळवे यांनी काय युक्तीवाद केला?

पहिला मुद्दा म्हणजे, विनेशने कोणतीही फसवणूक केलेली नाही, त्यामुळे तिला रौप्य पदक दिले पाहिजे. दूसरा मुद्दा असा मांडण्यात आला की, विनेश फोगाटचे वजन वाढणे ही शरीराची नैसर्गिक पुनर्प्राप्ती प्रक्रिया होती, ज्यामध्ये ती काहीही करू शकत नव्हती. खेळाडूला त्याच्या शरीराची काळजी घेण्याचा अधिकार असल्याचा दावा (Vinesh Phogat) करण्यात आला.

तसेच पहिल्या दिवशी विनेशचे वजन निर्धारित मानकांपेक्षा कमी असल्याचा चौथा आणि शेवटचा युक्तिवाद करण्यात आला. तसेच, पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे हा खेळाडूंचा मूलभूत अधिकार असल्याची बाजू देखील हरीश साळवे यांनी मांडली.

विनेशच्या प्रकरणावर ऑलिम्पिक समिती अध्यक्षांनी काय म्हटले?

या प्रकरणावर ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक म्हणाले की, विनेश फोगटच्या भावना मी समजू शकतो. पण, अशा परिस्थितीमध्ये सवलत दिल्यानंतर नेमकी रेषा कुठे काढायची याबद्दलही मला खात्री नाही. तिने क्रीडा लवादाकडे दाद मागितली आहे आणि शेवटी सीएएसचा जो निर्णय येईल तो आम्ही मान्य करू, असं थॉमस बाक(Vinesh Phogat) यांनी म्हटलं आहे.

त्यामुळे या प्रकरणावर आता लवकरच निर्णय येण्याची शक्यता आहे. विनेश फोगट आणि युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली आहे. या प्रकरणी आज 10 ऑगस्टरोजी किंवा उद्या निर्णय येण्याची शक्यता आहे.

News Title :  Vinesh Phogat disqualification case

महत्त्वाच्या बातम्या-

या 2 राशींवर शनीदेव नाराज? नुकसान होण्याची शक्यता

14 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या अभिनेत्यासोबत जान्हवी कपूरचा रोमांन्स, व्हिडीओ होतोय व्हायरल!

अमृता फडणवीसांच्या चाहत्यांसाठी मोठी गुड न्यूज!

Diabetes रुग्णांसाठी ‘हे’ फळ वरदानच, पावसाळ्यात आवर्जून खाल्ले जाते!

पुण्यातील पुरग्रस्तांसाठी दिलासादायक बातमी; सरकार देणार आर्थिक मदत