Vinesh Phogat | पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला सर्वात मोठा धक्का बसला आहे. भारताला चौथ पदक निश्चित करून देणारी कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat) हिला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आलं आहे. या मोठ्या निर्णयामागचं कारण म्हणजे 50 किलो वजनाच्या सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी तिचं वजन जास्त झालं होतं.
कुस्तीपटूचे वजन मर्यादेपेक्षा अंदाजे 100 ग्रॅम जास्त आहे, ज्यामुळे तिला अपात्र ठरवले आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, फोगट रौप्य पदकासाठीही पात्र होणार नाही आणि 50 किलोमध्ये फक्त सुवर्ण आणि कांस्यपदक विजेते असतील.
विनेश ओव्हरवेट झाल्याने या गटात सिल्वर मेडल कोणालाही मिळणार नाही. आता या कॅटेगरीत अमेरिकेच्या कुस्तीपटूला गोल्ड मेडल मिळेल. मंगळवारच्या सामन्यांसाठी विनेशने तिचं वजन 50 किलो किंवा त्यापेक्षा कमी ठेवलं होतं. ऑलिम्पिकच्या नियमानुसार कुस्तीपटूला सामन्याच्या दोन्ही दिवशी तितकच किंवा त्यापेक्षा कमी वजन कायम ठेवावं लागतं
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील 50 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत विनेशने मंगळवारी क्यूबाच्या पॅन अमेरिकन विजेत्या युस्नेलिस गुझमान लोपेझचा एकतर्फी लढतीत गुणांवर 5-0 असा पराभव केला. विनेशच्या विजयानंतर सोशल मीडियावर #दंगल ट्रेंड करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
खुशखबर! सोनं झालं स्वस्त, चांदीचाही मोठा दिलासा
पुढील काही दिवस राज्यात अशाप्रकारे असणार हवामान?
‘मोदी तेरी कब्र खुदेगी’च्या घोषणा देऊन..; कंगनाकडून विनेश फोगटला उपरोधिक शुभेच्छा
राज्यात वेगाने फोफावतोय ‘हा’ गंभीर आजार; पुण्यात सर्वाधिक रुग्ण
‘या’ महिलांना मिळणार 10 हजारांचा लाभ? सरकारची नवीन योजना