मोठी बातमी! विनेश फोगाटची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

Vinesh Phogat disqualified | भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिने पॅरिस ऑलम्पिकच्या (Paris Olympics 2024) महिला कुस्तीच्या 50 किलो गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र, आज तिला स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आलं आहे. विनेशने काल जपानच्या युई सुसाकी, युक्रेनच्या ओकसाना लिवाच आणि गुजमॅन लोपेजला हरवून फायनलमध्ये प्रवेश केला. या विजयामुळे भारताच्या सुवर्ण पदकाच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र, तिला फायनल पूर्वीच अपात्र (Vinesh Phogat disqualified) ठरविल्याने संपूर्ण देशवासीयांची निराशा झाली आहे.

विनेशलाही याच खूप दु:ख झालं आहे.अशात एक मोठी बातमी समोर आली आहे.विनेश बेशुद्ध झाली असून तिला पॅरिसच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ड‍िहायड्रेशन झाल्यामुळे ती बेशुद्ध झाली. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.

विनेश फोगाटची प्रकृती बिघडली

तिला IV फ्लूइड देण्याचा सल्ला दिलाय. विनेशने तिचं वजन कमी करण्यासाठी रात्रभर खूप मेहनत घेतली. त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होऊन ती बेशुद्ध झाली. सध्या तिच्या प्रकृतीबद्दल कोणतीही अपडेट समोर आली नाहीये. मात्र, तिच्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, विनेश फोगाटने क्युबाच्या युसनेलिस गुझमन लोपेझविरुद्ध 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला होता. विनेश फोगाट ऑलिम्पिक कुस्तीमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू, तर सुशील कुमारनंतरची पहिली भारतीय ठरली.(Vinesh Phogat disqualified)

विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र

विनेश फोगाट 50 किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती. मात्र तिचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे विनेश फोगाटला अपात्र ठवरण्यात आलं आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. परंतु तिचे वजन 100 ग्रॅम जास्त आल्याने तिला अपात्र (Vinesh Phogat disqualified) ठरवलं आहे.

स्पर्धेच्या नियमांनुसार, फोगट रौप्य पदकासाठीही पात्र होणार नाही आणि 50 किलोमध्ये फक्त सुवर्ण आणि कांस्यपदक विजेते असतील. यावरुन आता राजकारण सुरु झालं आहे. विनेशच्या कुटुंबियांनी थेट फेडरेशनवर गंभीर आरोप केले आहेत.फेडरेशनने तिच्याविरोधात कारस्थान रचल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. तर, कॉँग्रेसकडूनही हा मुद्दा उचलण्यात आला आहे.

News Title : Vinesh Phogat disqualified she is admitted in hospital

महत्त्वाच्या बातम्या-

विनेश फोगाट विरोधात कारस्थान?, कुटुंबाकडून फेडरेशनवर गंभीर आरोप

टाटा कंपनी भन्नाट फीचर्ससह सादर करणार सेन्सर कार; किंमत असणार सर्वांच्या बजेटमध्ये

दिवंगत अभिनेता सुशांत सिंहबद्दल सारा अली खानचा खळबळजनक खुलासा!

ते अचानक गेले अन्…; महिन्याभरात घडलं असं काही की पोलिसही चक्रावले

“तुझी माफी मागण्याची लायकी नाही, तुला..”; भाजपमध्ये गेलेल्या अभिनेत्याची पोस्ट