Vinesh Phogat l भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हिला ऑलिम्पिक फायनलमधून अपात्र घोषित करण्यात आले आहे. अपात्रतेची बातमी येताच संपूर्ण भारतीय चाहते संतापले आहेत. भारतीय कुस्ती आणि देशासाठी हा मोठा धक्का आहे, कारण विनेश फोगाट सुवर्णपदक जिंकण्याच्या अगदी जवळ होती. विनेश फोगाट ही तिच्या वाढत्या वजनामुळे अपात्र ठरली आहे. मात्र तुम्हाला कुस्तीच्या वजनाचा नियम काय आहे हे माहित आहे का? तर आज आपण जाणून घेऊयात…
जाणून घ्या काय आहे नियम? :
कुस्तीपटूंच्या वजन गटाशी संबंधित असा काय नियम आहे, ज्यामुळे विनेश फोगाटला महिलांच्या 50 किलो गटात अंतिम फेरी गाठूनही पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडावे लागले? कुस्तीशी संबंधित नियमांनुसार, कोणत्याही कुस्तीपटूला सामन्याच्या दोन्ही दिवशी त्याच्या वजन श्रेणीत राहावे लागते.
मात्र आज सकाळी विनेश फोगाटचे वजन तिच्या वजन श्रेणीपेक्षा 150 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले. आणि त्यामुळेच तिला अपात्र घोषित करण्यात आले. विनेश फोगटच्या या बातमीमुळे भारतीयांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
Vinesh Phogat l विनेशला कोणतंही पदक मिळणार नाही :
जर संध्याकाळी कुस्तीचा सामना असेल तर सामन्याच्या दिवशी सकाळी कुस्तीपटूचे वजन केले जाते. कुस्तीपटूला त्याच्या वजन श्रेणीतून जास्तीत जास्त 100 ग्रॅम वजन वाढवण्याची परवानगी असते. पण, विनेशचे वजन अधिक आढळून आले. वाढलेल्या वजनामुळे विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवले आहे. त्यामुळे तिला आता कोणतेही पदक मिळणार नाही. नियमांनुसार पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 50 किलो वजनी गटात फक्त कांस्य आणि सुवर्णपदके दिली जातील. मात्र आता विनेश बाहेर असल्याने तिला रौप्य पदक देखील मिळणार नाही.
विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिकच्या महिलांच्या 50 किलो वजनी गटात शानदार सुरुवात केली. तिने तिच्या पहिल्याच सामन्यात गत ऑलिम्पिक चॅम्पियनचा पराभव केला. यानंतर उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत प्रचंड बाजी लावून अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला. पण, आता तिला पॅरिस ऑलिम्पिकमधून ज्या प्रकारे बाहेर पडावे लागले आहे, ते खूपच धक्कादायक आहे.
News Title : Vinesh Phogat Disqualified, What is weight rules in wrestling?
महत्त्वाच्या बातम्या-
विनेश फोगाट विरोधात कारस्थान?, कुटुंबाकडून फेडरेशनवर गंभीर आरोप
टाटा कंपनी भन्नाट फीचर्ससह सादर करणार सेन्सर कार; किंमत असणार सर्वांच्या बजेटमध्ये
दिवंगत अभिनेता सुशांत सिंहबद्दल सारा अली खानचा खळबळजनक खुलासा!
ते अचानक गेले अन्…; महिन्याभरात घडलं असं काही की पोलिसही चक्रावले
“तुझी माफी मागण्याची लायकी नाही, तुला..”; भाजपमध्ये गेलेल्या अभिनेत्याची पोस्ट