Vinesh Phogat | महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने हरियाणा विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. तिने भाजपचे कॅप्टन योगेश बैरागी यांचा पराभव केला आहे. जिंदच्या जुलाना जागेवर विनेश फोगटने कॅप्टन योगेश बैरागी यांचा पराभव केला. विनेश फोगाटने योगेश बैरागी यांचा 6005 मतांनी पराभव केला आणि पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचली आहे. (Vinesh Phogat)
सुरुवातीला विनेश मागे होती. मात्र, नंतर तिने लिड घ्यायला सुरुवात केली. दुसरीकडे, INLD उमेदवार सुरेंद्र लाथेर यांना फक्त 10 मते मिळाली. विनेश कॉँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा लढली. कुस्तीचे मैदान गाजवणाऱ्या विनेशने राजकारणातही मोठं यश मिळवलं आहे.
विनेश फोगाटचा जुलानामधून दणदणीत विजय
जुलानाच्या जनतेने विनेशला पाठिंबा दिला. तिला 65080 मते मिळाली.या विजयानंतर विनेशला सर्वच स्तरातून शुभेच्छा देण्यात आल्या. पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या स्पर्धेत अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती. यानंतर विनेश काँग्रेसमध्ये प्रवेश करत थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरली. (Vinesh Phogat)
आता आमदार झालेल्या विनेश फोगाटची एकूण संपत्ती किती आहे, त्याचा खुलासा झाला आहे. 25 ऑगस्ट 1994 रोजी हरियाणातील चरखी दादरी येथे एका शिंपी कुटुंबात विनेश फोगाटचा जन्म झाला. विनेशकडे उत्पन्नाचे एकच नाही तर अनेक स्त्रोत आहेत.
विनेश फोगाटची एकूण संपत्ती किती?
विनेश फोगाटला युवा आणि क्रीडा मंत्रालयाकडून 6 लाख रुपये (प्रति महिना 50 हजार रुपये) वार्षिक वेतन मिळते. याचबरोबर अनेक जाहिरातीसाठी देखील ती काम करते. प्रत्येक जाहिरातीसाठी ती 75 लाख ते 1 कोटी रुपये आकारते. (Vinesh Phogat)
2024 पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी विनेश फोगटची एकूण संपत्ती 5 कोटी रुपये होती, परंतु आता त्यात मोठी वाढ झाली आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, विनेश फोगाटची सध्याची एकूण संपत्ती 36.5 कोटी रुपये आहे. तिच्याकडे मर्सिडीज जीएलई (1.8 कोटी), टोयोटा फॉर्च्युनर (सुमारे 35 लाख), टोयोटा इनोव्हा (28 लाख), व्होल्वो एक्ससी 60, ह्युंदाई क्रेटा यांसारख्या कार देखील आहेत. यासोबतच विनेशकडे हरियाणा येथे 2 कोटींचे घर आहे. विनेशचा पती सोमवीर राठी हा देखील कुस्तीपटू आहे, जो दोन वेळा राष्ट्रीय चॅम्पियन राहिला आहे.
News Title : Vinesh Phogat Net Worth
महत्वाच्या बातम्या –
आज नवरात्रीचा सातवा दिवस, देवी कालरात्री ‘या’ राशींना देणार सुख समृद्धी!
अजित पवारांना गुलीगत धोका; ‘हा’ बडा नेता साथ सोडणार
राज्यात खळबळ! ‘या’ माजी आमदारास पोलिसांनी ठोकल्या बेड्या
राज्यात आचारसंहिता कधी लागणार? अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली, सर्व दौरे रद्द