Vinesh Phogat | माजी कुस्तीपटू विनेश फोगाट हीने आता राजकारणात एंट्री घेतली आहे. तिने काल (6 सप्टेंबर) नवी दिल्लीत कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला.
विनेशसोबत भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया यानेदेखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. विनेशने कुस्तीला याआधीच रामराम ठोकला होता. त्यामुळे आता ती पुढे काय करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशात विनेशने थेट राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.(Vinesh Phogat)
विनेशने कॉँग्रेसमध्ये प्रवेश करताच तिला थेट विधानसभेचं तिकीट देखील मिळालं आहे. काँग्रेसने आगामी हरियाणा विधानसभा निवडणुकासाठी पहिली यादी जाहीर केली.काँग्रेसने पहिल्या यादीत 31 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. यामध्ये विनेश फोगाटचा देखील समावेश आहे.
विनेश फोगाट हरियाणातील जुलानामधून लढणार
विनेशला जुलाना विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली गेली आहे.जुलाना विधानसभा मतदारसंघातून सध्या जीजेपीचे अर्थात जननायक जनता पार्टीचे अमरजीत ढांडा हे विद्यमान आमदार आहेत. जेजेपीने यंदाही त्यांनाच उमेदवारी दिली आहे. भाजपकडून अद्याप येथे उमेदवार जाहीर करणे बाकी आहे. (Vinesh Phogat)
2019 च्या निवडणुकीत भाजपच्या परमिंदर सिंह ढुल यांचा अमरजीत ढांडा यांनी पराभव केला होता. त्यांना 61 हजार 942 मतं मिळाली होती. तर काँग्रेसला तिसऱ्या स्थानी समाधान मानावं लागलं होतं. काँग्रेसच्या धर्मेंद सिंह ढुल यांना 12 हजार 440 मते पडली होती.
“आमचे अश्रु फक्त कॉँग्रेसलाच समजले”
आता आगामी 2024 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी जुलानामधून कॉँग्रेसने विनेशला उमेदवारी दिली आहे. तर, बजरंग पुनियाला शेतकरी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आता विनेश कुस्तीप्रमाणे राजकीय मैदानही गाजवणार का?, याकडे सर्वांच्या नजरा असतील.
दरम्यान, कॉँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर विनेश फोगाटने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तिने भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) माजी प्रमुख आणि भाजप नेते ब्रिजभूषण सिंग यांच्यावर निशाणा साधत मोठं विधान केलं. “आमचे अश्रू फक्त काँग्रेस पक्षालाच समजले. माझ्या आयुष्यातील हा एक नवीन अध्याय आहे. मी इतर ॲथलीट्ससाठी काम करेन जेणेकरुन आम्ही जे अनुभवले त्यांना अनुभवा लागणार नाही.”, असं विनेश (Vinesh Phogat) म्हणाली.
News Title : Vinesh Phogat will contest the assembly elections from Congress
महत्वाच्या बातम्या-
गणपती बाप्पाच्या आगमनाने संकटे होतील दूर, ‘या’ राशींचे येणार सुवर्णदिवस
“… म्हणून आम्ही सारखे दिल्लीत जातो”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा
‘किती वेळा नवरे बदलले तू…’; एकनाथ खडसे संतापले