विनोद कांबळींची प्रकृती खालावली, तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!

Vinod Kambli

Vinod Kambli | भारतीय क्रिकटेच्या इतिहासातील एक प्रतिभाशाली फलंदाज विनोद कांबळी कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी विनोद आणि सचिन तेंडुलकर या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. एका कार्यक्रमात विनोद कांबळी यांची भेट सचिन तेंडूलकरसोबत झाली होती. या वेळी विनोदला काही आजाराचा सामना करावा लागत असल्याचं समोर आलं होतं. मात्र, सध्या विनोद कांबळी यांच्या प्रकृतीबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 

ठाण्याच्या रुग्णालयात दाखल-

विनोद कांबळी (Vinod Kambli) यांना शनिवारी रात्री उशिरा ठाणे येथील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेने क्रिकेट प्रेमी आणि त्याचे चाहते चिंतित झाले आहेत. अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं आहे. आकृती रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत.

काय म्हणाले डाॅक्टर?

विनोद कांबळी (Vinod Kambli) यांच्या तब्येतीची स्थिती बघता त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्या विविध चाचण्या करून त्यांच्या तब्येतीचा आढावा घेतला आहे आणि आवश्यक उपचार देण्यात येत आहेत. विनोद कांबळी यांच्या कुटुंबीय आणि नजीकच्या मित्र-परिवारजनांनी त्यांच्या तब्येतीसाठी चिंता व्यक्त केली आहे.

या घटनेबाबत रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही, मात्र, विनोद कांबळी यांच्या तब्येतीची स्थिती स्थिर आहे असं सांगितलं जात आहे. काही वर्षांपूर्वी विनोद कांबळींना हार्ट अटॅक आला होता. यावेळी विनोद कांबळींना तशीच समस्या जाणवत असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळेच त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. विनोद कांबळींचा एक व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामध्ये विनोद डॉक्टरांबरोबर असल्याचं दिसतंय.

शिवाय 14 वेळेस विनोद कांबळी रीहॅबला गेल्याचं म्हटलं गेलं आहे. त्यामुळे विनोदला अजूनही वैद्यकीय उपचारांची गरज असल्याचं बोललं जात आहे.

News Title : vinod kambli hospitalized at thane

महत्त्वाच्या बातम्या-

सरपंच हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींना ‘या’ तारखेपर्यंत अटक होणार? शिवसेना नेत्यानी दिली माहिती

वाल्मिकी कराडवर 23 गुन्हे, गुन्ह्यांची यादी मुख्यमंत्र्यांकडे देणार; सामाजिक कार्यकर्त्या आक्रमक

नाराज भुजबळ थेट भाजपाच्या वाटेवर?, CM फडणवीसांच्या भेटीनंतर चर्चेला उधाण

महसूलमंत्री अ‍ॅक्शनमोडमध्ये! वाळू माफीयांचे धाबे दणाणले

ऐन थंडीत पावसाचं सावट, शेतकऱ्यांची चिंता वाढली; पाहा कुठे-कुठे बरसणार?

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .