बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आरक्षणाच्या आड कुणी आलं तर शिवसेना पूर्ण ताकदीने मराठ्यांच्या बाजूने उभी राहणार”

मुंबई | सुप्रिम कोर्टात जाऊन मराठा आरक्षणाच्या आड कुणी येऊ नये. जर कुणी आलं तर शिवसेना पूर्ण ताकदीने मराठ्यांच्या बाजूने उभी राहील, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण वैध ठरविल्यानंतर मराठा मोर्चाचे समन्वयक आणि आरक्षणाची बाजू कोर्टात झुंझारपणे लढणारे विनोद पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर उद्धव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

कोणत्याही समाजाच्या ताटातील हिरावून न घेता मराठ्यांना आरक्षण मिळालं आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा कोणीही प्रयत्न करू नका, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

दरम्यान, विनोद पाटील यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिल्याबद्दल शिवसेनेचे आणि उद्धव ठाकरेंचे आभार मानले.

महत्वाच्या बातम्या-

-विनोद पाटील यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; आरक्षणाला पाठिंबा दिल्याबद्दल मानले आभार

-चौथ्या क्रमांकावर कोण बॅटींग करणार?; स्पृहा जोशी म्हणते…

-सुषमा स्वराज यांनी सोडलं शासकीय निवासस्थान; सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव

-के.पी. पाटलांच्या मेहुण्यासह जावयानेही केली एकाच मतदारसंघातून उमेदवारीची मागणी

विधानसभेच्या तोंडावर भाजप-शिवसेनेमध्ये ‘या’ मुद्द्यावरून जुंपणार?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More