मराठा आरक्षणाची लढाई पार पाडलीस, आता तू राजकारणात ये!

मराठा आरक्षणाची लढाई पार पाडलीस, आता तू राजकारणात ये!

नवी दिल्ली | मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिल्लीमध्ये साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली आहे. या भेटीचा तपशील विनोद पाटील यांनी फेसबुक पोस्टमधून मांडला आहे.

विनोद तू मराठा आरक्षणाची लढाई पार पाडलीस, आता तू राजकारणात ये, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं असल्याचं पाटील यांनी सांगितलं आहे.

महाराजांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीत छत्रपती उदयनराजेंनी मला अशा पध्दतीने आशीर्वाद दिले. महाराजांच्या या आशीर्वादाने मला खूप खूप बळ मिळाले, असं विनोद पाटील यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण मिळवण्यात आणि कोर्टात मराठा आरक्षणाची बाजू झुंझारपणे मांडण्यात विनोद पाटील यांची महत्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मुलीच काय मुलंही सुरक्षित नाहीत; जया बच्चन संसदेत भावूक

-मी शेतकऱ्यांचे मोबाईल मोफत रिचार्ज करणार ही एक अफवा!

-आझम खान लोकसभा उपाध्यक्षांना म्हणाले; “तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघत राहावेसे वाटते!”

“शरद पवार माझ्या हृदयात तर उद्धव-आदित्यचं बळ माझ्या शरीरात”

-अहिरांनी राष्ट्रवादी सोडली अन् पक्षाने लगोलग या नेत्याची मुंबई अध्यक्षपदी निवड केली!

Google+ Linkedin