महाराष्ट्र मुंबई

“पांडुरंग सोबतच आहे परंतू आरक्षणाचं काही बरं वाईट झाल्यास सरकार जबाबदार राहील”

मुंबई | मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच दुर्लक्ष होत असल्याचा आरोप याचिकाकर्ते विनोद पाटील पाटील यांनी केला आहे. राज्य सरकारच्या वतीने दिल्ली येथे कोणत्याही ज्येष्ठ विधीतज्ञांशी संपर्क झालेला नाही, असं विनोद पाटील यांनी म्हटलं आहे.

विनोद पाटील म्हणतात, “7 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची सुनावणी आहे. मात्र आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारच दुर्लक्ष आहे, कारण राज्य सरकारच्या वतीने दिल्ली येथे कोणत्याही ज्येष्ठ विधीतज्ञांशी संपर्क झालेला नाही. याशिवाय महाराष्ट्राचे मुख्य सरकारी वकील हे ३ महिन्यापासून मुंबईमध्ये आहेत, त्यांनी एखाद्या दिग्गज वकीलाशी संपर्क साधला का?”

“राज्य सरकारच्या वतीने कोणते ज्येष्ठ वकील आरक्षण टिकवण्यासाठी बाजू मांडतील? सुनीवणीची काय तयारी केली? सर्व सरकारी वकीलांना याेगय कागदपत्र पोहोच केलेत का? कधी मीटिंग घेणार? या बाबत तातडीने खुलासा करावा.”

“समाजाच्या वतीने मी लढा देत आहे, मी माझ्या वतीने सर्व तयारी केली आहे. दिग्गज विधितज्ञ आपल्या बाजूने युक्तिवाद करतील. परंतु शासनाची सुद्धा जबाबदारी आहे हे विसरू नये. पांडुरंग आपल्या सोबतच आहे परंतु आरक्षणाच काही बर वाईट झाल तर सरकार जबाबदार राहील”, असा इशारा विनोद पाटील यांनी सरकारला दिला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“सर्व मंत्र्यांचा ब्रेन लॉक झालाय, भाजपचं सरकार असतं तर कोरोनाबाबत अशी परिस्थिती उद्भवली नसती”

हिंदुस्थानी भाऊला आयएसआय या दहशतवादी संघटनेकडून जीवे मारण्याची धमकी!

महत्वाच्या बातम्या-

Doctor’s day- कोरोनाविरूद्ध लढणाऱ्या डॉक्टर योद्ध्यांना विराट-रोहितचा सलाम

“आपण कृषी क्षेत्राच्या विकासाचे धोरण राबवित आहोत, सुजलाम-सुफलाम महाराष्ट्र घडवू या”

BREAKING- मुंबईत आज मध्यरात्रीपासून 15 जुलैपर्यंत जमावबंदी लागू!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या