बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘गुणरत्न सदावर्ते नीट बोल, आमच्यात माज काढण्याची ताकद आहे’; संयमी विनोद पाटील भडकले

मुंबई | केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणप्रकरणी फेरविचार याचिका दाखल केली. यानंतर मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते आणि मराठा आरक्षण याचिकेचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. या चर्चेदरम्यान विनोद पाटील गुणरत्न सदावर्तेंवर चांगलेच भडकल्याचं पहायला मिळालं.

गुणरत्न सदावर्ते नीट बोल, संविधानिक भाषेत बोल. माजुर्डेपणाची ही भाषा मी तोंडावर ऐकून घेणार नाही. कोणता अधिकार आहे, चार जणांकडून पैसे घेऊन मराठा आरक्षणाला विरोध करायचा, असं विनोद पाटील म्हणाले.

आम्हाला माजुर्डे म्हणायचे आणि आम्ही विरोध करायचा नाही हे योग्य आहे काय?, याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे का, हे ऐकणारी मराठ्याची औलाद नाहीया माणसाचं आयुष्य ब्लॅकमेलिंगमध्ये गेलं. हे आम्हाला काय ज्ञान शिकवणार, आमच्यात माज काढण्याची ताकद आहे, नीट बोल. तसेच मी मराठा आरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे. चुकीची भाषा मी सहन करणार नाही, अशा शब्दात विनोद पाटलांनी गुणरत्न सदावर्तेंना सुनावलं.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने 5 मे रोजी मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर आज 102 व्या घटना दुरुस्तीनुसार राज्यांकडे आरक्षण देण्याचा अधिकार आहे. राज्याचे आरक्षण देण्याचे अधिकार काढून घेतलेले नाहीत. राज्याच्या अधिकाराला बाधा पोहोचवता येणार नाही, अशी भूमिका केंद्र सरकारने फेरविचार याचिकेतून सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे.

पाहा व्हिडीओ- 

 

थोडक्यात बातम्या- 

WHO प्रमुखांच्या ‘या’ वक्तव्यानं जगाचं टेन्शन वाढलं, दिला हा गंभीर इशारा

‘कुठून हे नग मिळतात?’; ‘या’ भाजप नेत्यावर जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका

आनंदाची बातमी! राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या जास्त, 53 हजारांपेक्षा रूग्ण परतले घरी

‘या’ राज्यात लॉकडाऊनच्या सकारात्मक प्रभावामुळे सरकारने आणखी लॉकडाऊन वाढवला

“खिजगणतीत नसलेल्या पृथ्वीराज चव्हाणांना मोदी नॉन परफॉर्मिंग असेट वाटणं स्वाभाविक”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More