Top News

मराठा आरक्षण लढ्यात बलिदान दिलेल्या सदस्यांच्या कुटुंबासाठी ठाकरे सरकारची मोठी घोषणा!

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पाडली. याबैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये मराठा आरक्षण लढ्यात बलिदान दिलेल्या सदस्याच्या कुटुंबासाठी ठाकरे सरकारने एक मोठी घोषणा केली आहे.

मराठा आरक्षणाच्या लढ्यात बलिदान दिलेल्या तरुणांच्या कुटुंबियांना सरकारी मदत आणि नोकऱ्या देण्याची मोठी घोषणा राज्य सरकारने केली आहे. या निर्णयाचं राज्यभरातून मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात येत आहे.

सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि आर आर पाटील फौंडेशन संस्थेचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी ट्विट करत स्वागत केलं आहे.

दरम्यान, मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मला आत्ताच माहिती दिली की, मराठा आरक्षण लढ्यात ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नौकरी आणि आर्थिक मदत करण्याचा निर्णय आज कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाबद्दल अजितदादा पवार, एकनाथ शिंदे साहेब व सर्व मंत्रिमंडळाचे जाहीर आभार, असं ट्विट विनोद पाटील यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

शरद पवार आमचे कुटुंबप्रमुख, प्रत्येकाला सूचना देण्याचा त्यांना अधिकार- जयंत पाटील

पार्थला फटकारल्यानंतर अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट

मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शैक्षणिक मंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय

शरद पवारांच्या कडवट टीकेवर पार्थ पवार यांची अतिशय सायलेंट प्रतिक्रिया…!

पुण्यात कोरोनाचा कहर सुरुच; आज दिवसभरात दीड हजारांहून जास्त रुग्ण आढळले!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या