बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विनोद पाटील यांचा राज्य सरकारला इशारा, म्हणाले…

औरंगाबाद | 15 दिवसात सरकारने आरक्षणाविषयी भूमिका मांडावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच असं न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा  विनोद पाटील यांनी दिला आहे.

मागच्या आयोगाचा अनुभव पाहता आता आम्ही OBC आहोत मग OBC तून आरक्षण का नको, असा सवाल त्यांनी केला. आम्हाला राजकीय आरक्षण नाहीच, पण आम्ही केवळ शैक्षणिक आणि रोजगारविषयी आरक्षणाची मागणी करतो आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मराठा क्रांती मोर्चाची महत्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीनंतर विनोद पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितलं की बैठकीतील मागण्या सरकारकडे मांडणार आहे.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More