बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विनोद तावडे म्हणतात, धर्माच्या आधारे आरक्षण देता येणार नाही…

मुंबई |  मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शुक्रवारी विधान परिषदेत काही काळ गोंधळ पाहायला मिळाला. मुस्लिम आरक्षणाची आग्रही मागणी विरोधकांनी केली. त्यावर विनोद तावडे यांनी भाष्य केलं.

मुस्लिम समाजातील मागास प्रवर्गाला आजही आरक्षण आहे. मग धर्माच्या आधारावर आरक्षण हवेच कशाला? असा सवाल अल्पसंख्याक मंत्री विनोद तावडे यांनी विरोधकांना केला आहे.

समाजातील सर्व घटकांच्या हिताचे रक्षण करण्याबाबत आमचे सरकार संवेदनशील आहे. मात्र, राज्यघटनेत धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे, असं तावडे म्हणाले.

सत्तेत असताना काँग्रेसने मुस्लिमांच्या विकासासाठी काहीही केलेले नाही. म्हणूनच लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर, ओवेसी हे तुमचे सगळे ‘वंचित’ घेऊन गेले, असा टोला त्यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या

-पीकविमा कंपन्यांनी धंदा मांडून ठेवलाय; शेतकऱी प्रश्नावरून बच्चू कडू गरजले

-मुख्यमंत्रीपदाबाबत अमित शहांशी बोललो आहे, दुसऱ्यांनी नाक खुपसू नये- उद्धव ठाकरे

-या तारखेच्या दरम्यान विधानसभा निवडणूक होईल; चंद्रकांत पाटलांचा अंदाज

-अफगाणिस्तान विरोधात रोहित शर्माची स्वस्तात माघार

शरद पवार साहेब अतुलनीय शक्ती; माझे जीव की प्राण- जितेंद्र आव्हाड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More