मुंबई | कोरेगाव भीमा दंगलीमागे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा हात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. यावरुन चांगलंच राजकीय वातावरण तापलं होतं. या पार्श्वभूमीवर भाजप नेते विनोद तावडे यांनी पवारांवर पलटवार केला आहे.
शरद पवार यांना शहरी नक्षलवाद्यांना वाचवायचं आहे. त्यासाठीच त्यांनी हा आरोप केला आहे. एखाद्या गुन्हेगाराला वाचवायच्या नादात आपला जीव धोक्यात घालणाऱ्या पोलिसांवर शरद पवार अविश्वास दाखवत आहेत. त्याचं मनोबल कमी करत आहेत, असं विनोद तावडे म्हणाले आहेत.
शरद पवार राज्याचे गृहमंत्री राहिले आहेत. त्यांनी अशाप्रकारचं वक्तव्य करुन दिवसरात्र काम करणाऱ्या पोलिसांचं मनोबल तोडणं दुर्दैवी आहे. शरद पवारांकडून ही अपेक्षा नव्हती, अशी टीका तावडे यांनी केली आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन पानांचे पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये कोरेगाव भीमा प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
संबंधित बातम्या-
भीमा-कोरेगाव दंगलीमागे फडणवीस सरकारचा हात; शरद पवारांचा गंभीर आरोप
महत्वाच्या बातम्या-
भीमा-कोरेगाव दंगलीमागे फडणवीस सरकारचा हात; शरद पवारांचा गंभीर आरोप
“तुमचा फोन टॅप होतोय, भाजपच्या माजी मंत्र्यांनीच मला माहिती दिली”
शरद पवारांच्या घरातील सुरक्षा व्यवस्था मोदी सरकारने हटवली
आमच्यासोबत यायचं असेल तर ही अट मान्य करावी लागेल- चंद्रकांत पाटील
Comments are closed.