Vinod Tawade | राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता काही तास शिल्लक राहिले आहेत. याच वेळी राज्याच्या राजकारणात मोठा राडा झाल्याचं चित्र समोर आलं. सध्या विरारमध्ये चांगलाच राजकीय ड्रामा पाहायला मिळत आहे. येथे पैसे वाटल्याच्या आरोपांवरून भाजप आणि बविआमध्ये तूफान राडा झाला आहे.
भाजपचे नेते विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी पैसे वाटले, असा आरोप बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. सोशल मीडियावर तर तावडेंचा व्हिडीओ देखील तूफान व्हायरल होत आहे. हे सुरु असताना दुसरीकडे, आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. ज्या हाॅटेलमध्ये विनोद तावडे पकडले गेले त्याच हाॅटेलच्या एका खोलीत 7 महिला सापडल्या.
नेमकं प्रकरण काय आहे?
विरार पूर्वेला मनवेलपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये मोठा राडा झाला. निवडणुकीला काही तास बाकी असताना तावडे (Vinod Tawade) पैसे वाटताना सापडले. विरार येथील विवांत हाॅटेलमध्ये हा सगळा प्रकार घडला. त्यानंतर बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार क्षितीज ठाकूर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह हजेरी लावली.
दरम्यान, यावेळी हॉटेल विवांतमध्ये क्षितीज ठाकूर यांनी कार्यकर्ते, पोलिसांसह हॉटेलच्या काही रुमची झडती घेतली. त्याच वेळी 7 महिला आढळून आल्याने खळबळ उडाली. या महिलांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी आपण सगळे एका ग्रुपने आलो असल्याचं सांगितलं. आपण एका व्यक्तीसोबत आलो असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. या सगळ्या महिला विविध वयोगटातील असल्याची माहिती देण्यात आली आहे.
ठाकूर काय म्हणाले?
ठाकूर म्हणाले, विनोद तावडे हे आज पैसे वाटण्यासाठी येत असल्याची माहिती मला मिळाली होती. ही माहिती मला भाजप नेत्याने दिली होती. त्यानंतर आम्ही आज त्या ठिकाणी दाखल झालो. तावडे यांना कारवाईशिवाय सोडणार नाही, असा इशारा देखील हितेंद्र ठाकूर यांनी दिला.
News Title : vinod tawade found with money bundles
महत्त्वाच्या बातम्या –
मनोज जरांगेंचं मराठा समाजाला महत्वाचं आवाहन, म्हणाले…
विनोद तावडेंच्या डायरीत नेमकं काय लिहिलं?; हितेंद्र ठाकूरांच्या खुलाशाने खळबळ
एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला दिलं मोठं आश्वासन!
‘मला माफ करा, जाऊ द्या..’ पैसे वाटताना पकडताच तावडेंकडून विनवणी; विरारमध्ये नेमकं काय घडलं?
विनोद तावडेंनी 5 कोटी वाटले, माझ्याकडे डायरी..; विरारमध्ये बविआ-भाजपमध्ये मोठा राडा