Top News

ही भीक नाही तर जनतेने जिव्हाळ्याने केलेली मदत- विनोद तावडे

मुंबई |  स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कुणाची भीक नको आहे, अशा शब्दात राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मंत्री विनोद तावडे यांना सुनावलं होतं. त्यावर राजे… ही भीक नव्हती तर जनतेने जिव्हाळ्याने केलेली मदत होती, असं प्रत्युत्तर मंत्री विनोद तावडे यांनी संभाजीराजेंना दिलं आहे.

पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्राने एवढ्या जिव्हाळ्याने केलेली मदत संभाजीराजेंना भीक का वाटावी?? असा सवाल विनोद तावडेंनी संभाजीराजेंना विचारला आहे.

स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भीकेची गरज नाही. महाराष्ट्राच्या मंत्र्याला भीक मागण्याची वेळ यावी? ह्यापेक्षा दुर्दैव काय? हा व्हिडीओ आत्ताच पाहिला, इथे भीक स्वीकारली जाणार नाही. पुरग्रस्तांची क्रूर चेष्टा सहन केली जाणार नाही, असं ट्वीट करत छत्रपती संभाजीराजेंनी आपला संताप व्यक्त केला होता.

दरम्यान, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी भाजपने मदतफेरीचं आयोजन केलं होतं. त्यावरच संभाजीराजेंनी आक्षेप नोंदवला होता.

महत्वाच्या बातम्या-

पी. चिदंबरम यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

-सरकार आपल्या डोक्यावर मिरच्या वाटतंय- खासदार अमोल कोल्हे

-दानवेंच्या होम ग्राऊंडवर धनंजय मुंडेंची तोफ धडाडली; म्हणतात हे तर ‘खाऊसाहेब दानवे…!’

-शिवसेना प्रवेशाच्या चर्चांवर छगन भुजबळ म्हणतात…

-…परंतू या सगळ्याला राज ठाकरे बळी पडणार नाहीत- प्रकाश आंबेडकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या