बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादीच्या नादाला लागून सुभाष देसाईंसारखा माणूस खोटं बोलायला लागला- विनोद तावडे

मुंबई | मुंबईत प्रस्तावित असलेलं आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र अर्थात IFSC केंद्र गांधीनगर हलवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. राज्यातील राजकारण तापलं आहे.

शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी IFSC केंद्रा प्रकरणी बोलताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता. त्याला भाजपचे नेते विनोद तावडे यांनी उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीच्या नादाला लागून सुभाष देसाईंसारखा सज्जन माणूस खोटं बोलायला लागला आहे, अशी बोचरी टीका तावडे यांनी केली आहे. ते एका मुलाखतीत बोलत होते.

मंत्रिमंडळ बैठकीत जर उद्योग खात्याचा विषय असेल, तर सुभाष देसाई हे लक्ष द्यायचे. इतर विषय असल्यावर त्यांचं लक्षही नसायचं. असं असताना करोनाच्या परिस्थितीत राज्य सरकार काही करू शकत नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हा आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राचा विषय चालवत आहेत. त्यांच्या नादाला लागून सुभाष देसाई यांच्यासारखा सज्जन माणूस खोटं बोलायला लागला आहे. हे अतिशय वाईट आहे, असं तावडे म्हणाले आहेत.

दरम्यान, देसाईंनी जर मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं असेल, तर पुरावे द्यावे. नुसतं हवेत कशाला बोलायचं. त्यामुळे मला वाटतं देसाई यांचं हे वागणं बरं नव्हं, असं विनोद तावडे म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

भाजपने विधानपरिषदेची एक जागा ‘रिपाइं’ला सोडावी- रामदास आठवले

“मजूरांकडून रेल्वेभाडं घेणार नाही तर प्रत्येकी पाचशे रुपये मदत देणार”

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतले ‘हे’ मोठे आर्थिक निर्णय

मे अखेरीस राज्यात मोठ्या प्रमाणात ग्रीन झोन दिसला पाहिजे; मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

सुरतमध्ये परप्रांतीय मजुरांची पोलिसांवर दगडफेक; परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराचा वापर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More