मराठा आरक्षणाविरोधात याचिका हा तर विरोधकांचा डाव!

Vinod Tawade
शिक्षणमंत्री विनोद तावडे

मुंबई | मराठा आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. हा विरोधकांचा डाव आहे, असा आरोप शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला आहे. ते पत्रकारांशी  बोलत होते. 

राज्य सरकारनं मराठा आरक्षण दिलं, हे अनेकांना झोंबलं आहे. त्यामुळे याचिका हा विरोधकांचा डाव आहे, असं तावडेंनी म्हटलं. तसंच याचिकेला उत्तर देण्यासाठी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात वकिलांची फौज उभी करण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. 

मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयातील वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-6 चेंडूत लगावले 6 षटकार; ऑस्ट्रेलियाच्या युवा खेळाडूची कामगिरी

-समोरच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी चक्क घुबडांचा वापर!

-चक्क पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधलेलं घरच गेलं चोरीला!

-शरद पवार आणि नारायण राणेंच्या भेटीवर चंद्रकांत पाटील म्हणतात…

-तुमच्यासाठी कायपण!!! उद्धव ठाकरेंसाठी मुख्यमंत्र्यांनी मोडला प्रोटोकॉल