महाराष्ट्र सोलापूर

विधानसभा आणि लोकसभा एकत्र होतील का?, विनोद तावडे म्हणाले…

सोलापूर | आधी लोकसभा लढवू नंतर विधानसभेचं बघू, असं सुचक वक्तव्य शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केलं आहे. ते सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

भाजप आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या लढणार असल्याचं सुचक वक्तव्य त्यांनी यातून केलं आहे.

राज्यात विधानसभा आणि लोकसभेच्या 2 स्वतंत्र आचार संहिता लागतील, असंही तावडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपने लोकसभेची मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. पण एकत्र निवडणूक घेण्याबाबत सावध पवित्रा घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘काळे पान! बाके बडवून सत्य मरेल काय?’, शिवसेनेचा ‘राफेल’वरुन निशाणा

शरद पवारांनी या वयात लोकसभा लढवू नये; भाजप करेल पराभव- चंद्रकांत पाटील

पुणतांबा अन्नत्याग आंदोलनकर्त्या मुलींच्या उपोषणावर पोलिसांची कारवाई!

“राफेल करार हवाई दल बळकटीकरणासाठी की गाळात बुडालेल्या उद्योगपतीच्या बळकटीकरणासाठी?”

उपमुख्यमंत्रीपदावर असताना माझ्याही गाडीला ट्रकनं धडक दिली होती- अजित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या