Top News महाराष्ट्र मुंबई

पंकजा मुंडे यांच्या मनधरणीसाठी भाजपची धावपळ; विनोद तावडे ‘रॉयलस्टोन’वर

मुंबई | राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टनंतर राजकीय वर्तुळात बरीच खळबळ उडाली होती. त्यानंतर पंकजा मुंडे भाजपतून शिवसेनेत जाणार असल्याचंही बोलल जातंय. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या मनधरणीसाठी भाजपकडून धावपळ सुरू असल्याचंच चित्र पाहायला मिळतंय.

पंकजा मुंडेंच्या फेसबुक पोस्टचा विरोधकांकडून चुकीचा अर्थ लावला जात आहे, असं माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले आहेत. लोणीकर यांच्या भेटीनंतर  विनोद तावडे हे पंकजा यांची भेट घेण्यासाठी रॉयलस्टोन या शासकीय बंगल्यावर आले आहेत. तावडे यांच्याबरोबर माजी राज्यगृहमंत्री राम शिंदे हे बरोबर असल्याचं समजते.

भाजपचे सरकार चार दिवसात कोसळल्यानंतर पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून मार्ग ठरवणार असल्याचं म्हटलं होतं. विशषतः त्यांनी ट्विटर प्रोफाईलमधून भाजपाचा उल्लेखही काढून टाकला. शिवसेनेचे कौतूक करणारे ट्विट त्यांनी केले. त्यातून त्या शिवसेनेत जाणार अशी चर्चा सुरू झाली. याविषयी बोलताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही यावर काहीस गुढ उत्तर दिलं होतं.

भाजपचे नेते बबनराव लोणीकर यांनी दुपारी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. त्यांना विधान परिषदेवर घ्यावं, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या