हट्टी कुलगुरुंमुळेच मुंबई विद्यापीठाच्या निकालांचा घोळ- विनोद तावडे

मुंबई | मुंबई विद्यापीठाच्या लांबलेल्या निकालांचं खापर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अखेर कुलगुरुंवर फोडलं आहे. हट्टी कुलगुरुंमुळे निकालाचा घोळ झाला, असं त्यांनी म्हटलंय. 

‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं निकालामुळे नुकसान झालं, हे त्यांनी मान्य केलं. 

दरम्यान, ज्या शाळांचे निकाल 15 ते 20 टक्के लागतात, त्या शाळांमधील शिक्षकांना का पगारवाढ द्यायची, असा सवाल त्यांनी विचारला. तसेच शिक्षक मंत्री नव्हे तर शिक्षण मंत्री असल्याचं सांगत कठोर पावलं उचलणार असल्याचं सांगितलं.