रत्नागिरी | संसदेत कृषी कायदा मांडला तेव्हा त्याला पाठिंबा दिला गेला. त्यानंतर भूमिका कशी बदलते? काही पक्ष तटस्थ राहिले ते पक्ष आज विरोध कसा करु शकतात? असा सवाल भाजप नेते विनोद तावडे यांनी केला आहे.
आधीच्या सरकारमध्ये कायदा मांडताना काही लोकं सरकारमध्ये होते. मात्र, आज ते विरोध कसे करतात? असा जर विरोध असेल आणि त्यासाठी भारत बंदला पाठिंबा असेल तर या मुद्यावरून राजकारण केलं जातंय, असं विनोद तावडे म्हणाले.
घटनेप्रमाणे केंद्राने केलेला कायदा राज्याला लागू असतो. राज्याला त्यापेक्षा कडक करायचा असेल तर राज्य सरकार कायदा बदलू शकतं. हे अधिकार घटनेने नेमून दिलेले अधिकारी आहेत. कायद्यात बदल करायचे असतील तर राष्ट्रपतींची अनुमती मिळते, असं तावडे म्हणाले.
दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरु असल्याचा दावा केला आहे. मात्र, त्यांच्या या दाव्यात तथ्य नसल्याचं तावडे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
7/12 वाचवायचा असेल तर 8/12 महत्वाचा आहे- बच्चू कडू
बच्चू कडूंनी केलेली मदत ‘तो’ विसरला नाही; न सांगताच केलं कौतुकास्पद काम!
अर्णब गोस्वामींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका!
राज ठाकरेंची मराठी माणसाबद्दलची भूमिका मान्य, पण…- देवेंद्र फडणवीस
‘भारत बंद’ यशस्वी करून झोपी गेलेल्या केंद्र सरकारला जागं करा- अशोक चव्हाण
Comments are closed.