‘मला दहा मिनिटं…’; विनोद तावडेंचा आणखी एक खळबळजनक व्हिडिओ समोर

Vinod Tawde Video in front at Vivanta Hotel

Vinod Tawde | मतदानाच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यातच विरारमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे तर राज्यभर खळबळ उडाली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरारमधील एका हॉटेलात पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडी (BVA) पक्षाने केला. विनोद तावडे (Vinod Tawde) हे विरारमधील एका हॉटेलमध्ये 5 कोटी रुपये घेऊन आले होते, असा दावा बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला होता. या हॉटेलमध्ये काल भाजप आणि बविआ कार्यकर्त्यांमध्ये तूफान राडा पाहायला मिळाला.

अशात विनोद तावडे यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये विनोद तावडे एका सभागृहात सभा घेत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असतानाही विनोद तावडे हे “दहा मिनिटे बोलू द्या” असं सांगताना व्हिडिओत दिसून येतंय. कार्यकर्त्यांसोबत चहा घेत असल्याचे कारण पुढे करत त्यांनी सभा घेतली.

बहुजन विकास आघाडीने विनोद तावडे यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केले असल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर, तावडे यांनी निवडणूक आयोग आणि कायदा याकडे दुर्लक्ष करत कार्यकर्त्यांसमोर भाषण ही केले. यावर बहुजन विकास आघाडीने कारवाईची मागणी केली आहे. (Vinod Tawde)

नेमकं काय घडलं?

विनोद तावडे हे काल मंगळवारी विरार पूर्वेला असणाऱ्या मनोरीपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये आले होते. त्यावेळी भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि भाजपचे काही पदाधिकारी हॉटेलमध्ये आले होते. त्यांच्यात बैठक सुरु होती, असा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला. विनोद तावडे(Vinod Tawde) हे विरारमधील एका हॉटेलमध्ये 5 कोटी रुपये घेऊन आले होते. ही गोष्ट बविआच्या (BVA) कार्यकर्त्यांना समजली तेव्हा त्यांनी हॉटेलवर धाव घेतली. यानंतर हॉटेलमध्ये बविआ आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.

विनोद तावडे यांच्याबद्दल माहिती असणारी डायरी आपल्याकडे असल्याचा दावा देखील हितेंद्र ठाकूर यांनी केला होता. जोवर विनोद तावडे खाली येऊन बोलत नाहीत. तोवर मागे हटणार नाही. तावडेंना बाहेर जाऊ देणार नाही, अशी भूमिका बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी घेतली होती. यानंतर हॉटेलमध्ये पोलीसही दाखल झाले होते.

विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर यांची पत्रकार परिषद-

त्यानंतर विनोद तावडे यांनी हितेंद्र ठाकूर यांच्या शेजारी बसून पत्रकार परिषद घेतली. आम्ही वोटिंग मशीनची माहिती दिली होती. त्यामुळे आचारसंहितेचा भंग झालेला नाही. वास्तव आम्ही सांगितलं. हितेंद्र आप्पांनीही सांगितलं. आता निवडणूक आयोग आणि पोलीस काय ते करतील, असं विनोद तावडे म्हणाले होते. तर, हितेंद्र ठाकूर म्हणाले की, तुम्ही इथे कशाला आला होता?, इथे डायऱ्या सापडल्या. एकाच रुममध्ये 10 लाख रुपये होते. हे पैसे कुणाचे आहेत? आता हितेंद्र ठाकूरचे होते म्हणून सांगू नका.असं असेल तर मी घेऊन जातो. मला उपयोगी पडतील कामधंद्याला, असं खोचकपणे हितेंद्र ठाकूर पत्रकार परिषदेत म्हणाले. (Vinod Tawde)

News Title –  Vinod Tawde Video in front at Vivanta Hotel

महत्त्वाच्या बातम्या-

नागरिकांनो ‘या’ पैकी कोणतेही एक कागदपत्र असले तरी करता येणार मतदान!

288 जागांसाठी आज मतदान, महाविकास आघाडी vs महायुतीमध्ये चुरशीची लढत

स्वामींच्या कृपेने आज ‘या’ राशींना मिळणार भरभरून यश, मोठं पदही मिळणार!

‘मतदानरुपी राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा’; संभाजी पाटील निलंगेकर यांचं आवाहन

“स्क्रिनवर आपले कपडे…”, ऐश्वर्या रायकडून ‘त्या’ गोष्टींचा खुलासा!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .